GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

मतदार संघातील उद्यान विकसित करण्यासाठी दोन कोटी रुपयाचा निधी मंजुर; माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांची माहीती

उदगीर व जळकोट शहरातील उद्यान विकसित करण्यासाठी प्रत्येकी एक - एक कोटींचा निधी

मतदार संघातील उद्यान विकसित करण्यासाठी दोन कोटी रुपयाचा निधी मंजुर; माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांची माहीती

उदगीर : मतदार संघातील उदगीर व जळकोट शहरातील उद्यान विकसीत करण्यासाठी या भागाचे आमदार संजय बनसोडे हे प्रयत्नशील होते. त्यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागातुम "वैशिष्ट्यपूर्ण" योजनेअंतर्गत उदगीर शहरातील नगर परिषद अंतर्गत 'नमो उद्यान' विकसित करण्यासाठी एक कोटी तर जळकोट येथील नगरपंचायत क्षेत्रात "नमो उद्यान" विकसित करण्यासाठी एक कोटी असे दोन कोटी रुपयाच्या निधीस शासनाने मान्यता दिली असुन सदर उद्यान विकसित करण्यासाठी उदगीरला एक कोटी व जळकोट शहराला एक असे दोन कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी दिली आहे.
राज्यातील नगरपरिषदांना "वैशिष्ट्यपूर्ण" कामासाठी विशेष अनुदान देण्यात येते.  सदर शासन निर्णयांच्या अनुषंगाने "वैशिष्ट्यपूर्ण" या योजनेअंतर्गत राज्यातील नगर परिषद व नगर पंचायतीमध्ये एक उत्कृष्ट उद्यान विकसित करुन शहरातील नागरीकांना चांगल्या दर्जाची उद्याने उपलब्ध व्हावीत या उद्देशाने सदर उद्याने विकसित करण्यात येणार असुन विकसित करण्यात आलेल्या उद्यानांची विभाग स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे व राज्यातील नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान देण्यात येणार असुन सदर योजनेंतर्गत प्रत्येक नगर परिषद व नगर पंचायतीस उत्कृष्ट उद्यान विकसित करण्याकरीता एक कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
 विकसित करण्यात आलेल्या नमो उद्यानांची विभागीय स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून स्पर्धेबाबतचे निकष स्वतंत्र आदेशान्वये निर्गमित करण्यात येणार आहेत.
 नमो उद्यान स्पर्धेतून प्रत्येक प्रशासकीय विभागाअंतर्गत तीन उद्यानांची निवड करण्यात येणार आहे व प्रथम नमो उद्यानाचा मान मिळविण्याऱ्या नगर परिषद किंवा नगर पंचायतीस पाच कोटी रुपयाच्या निधीची कामे "वैशिष्टयपूर्ण" योजनेतून मंजूर करण्यात येणार आहेत तसेच द्वितीय व तृतीय नमो उद्यानाचा मान मिळविणाऱ्या नगरपरिषद / नगरपंचायतीस अनुक्रमे तीन कोटी व दोन कोटी रुपयांच्या निधीची कामे मंजूर करण्यात येणार असल्याने आपल्या उद्यानाचे काम हे दर्जेदार व गुणवत्तापुर्ण करुन आपण या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवणार असल्याचे आ.संजय बनसोडे यांनी सांगितले आहे.
उदगीर व जळकोट शहरातील उद्यानासाठी सदर निधी मंजूर केल्याबद्दल आ.संजय बनसोडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत. उदगीर व जळकोट येथे उद्यानासाठी निधी मंजूर केल्याने माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांचे उदगीर व जळकोट तालुक्यातील नागरिकांनी अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहेत.
****************************

Post a Comment

0 Comments