GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

डिजीटल मीडिया परिषदेच्या लातुर जिल्हा सचिवपदी श्री.सिध्दार्थ सुर्यवंशी यांची निवड

डिजीटल मीडिया परिषदेच्या लातुर जिल्हा सचिवपदी श्री.सिध्दार्थ सुर्यवंशी यांची निवड

उदगीर - अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजीटल मिडिया परिषदेच्या लातुर जिल्हा सचिवपदी श्री.सिध्दार्थ सुर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.श्री.एस.एम. देशमुख सर यांच्या आदेशाने डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे व लातूर जिल्हाध्यक्ष बिभीषण मद्देवाड यांनी डिजिटल मीडिया परिषदेच्या लातुर जिल्हा सचिवपदी निवड केली असुन  डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, डिजिटल मिडीयाचे लातूर जिल्हाध्यक्ष बिभीषण मद्देवाड यांनी नियुक्ती पत्र देवुन केली आहे.

 अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे हात बळकट करण्यासाठी तसेच मराठी पत्रकार परिषदेच्या विविध विषयांचे राज्यभरात डिजिटल मिडियाचे नेटवर्क राबविण्यात येत आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या विविध कार्यक्रमांचे यु - ट्यूब चॅनल, पोर्टल, फेसबुक पेज लाईव्ह वर थेट प्रक्षेपण करुन मराठी पत्रकार परिषदेचे डिजिटल नेटवर्किंग करावे. तसेच तळागाळातील पत्रकारांना आपल्या डिजिटल मिडिया परिषदेच्या सोबत जोडणे आवश्यक आहे. यासह इतर जबाबदाऱ्या जिल्हाध्यक्ष बिभीषण मद्देवाड व जिल्हा सचिव सिध्दार्थ सुर्यवंशी यांच्या वर सोपवण्यात आल्या आहेत. 
यावेळी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अर्जुन जाधव, सुनिल हावा, आदी उपस्थित होते.
सिध्दार्थ सुर्यवंशी यांची डिजिटल मिडिया परिषदेच्या लातुर जिल्हा सचिवपदी नव्याने निवड झाल्याबद्दल अभिनंदन करुन शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
*************

Post a Comment

0 Comments