GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या कार्याचा लंडनमध्ये गौरव

माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या कार्याचा लंडनमध्ये गौरव

18 ऑगस्ट रोजी आमदार संजय बनसोडे यांना 'महाराष्ट्ररत्न पुरस्कार'

उदगीर : राज्याचे माजी क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री तथा उदगीर - जळकोट मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे यांच्या कार्याची दखल घेऊन लोकमत समूहातर्फे 'महाराष्ट्ररत्न पुरस्कार' मान्यवरांच्या उपस्थितीत लंडन येथे दिला जाणार आहे.

आ.संजय बनसोडे यांनी, पहिल्यांदा निवडून येवुन मतदार संघाचा मागील २५ वर्षाचा बॅकलाॅग भरुन काढला.
उदगीर व जळकोट येथे प्रशासकीय इमारत, शासकीय विश्रामगृह, मराठा भवन, लिंगायत भवन, बुध्द विहार, शादीखाना, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय, तिरु नदीवरील बॅरेजेस, महावितरणे कार्यालय, ग्रामीण रूग्णालये, महापुरुषांचे पुतळे, जळकोट व उदगीर शहराला राष्ट्रीय महामार्गाने जोडणारे सर्व रस्ते, विविध वाडी तांड्यावर योजना पोहचवल्या, कायमस्वरुपी पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी वाॅटरग्रीड योजना आणली. भविष्यातील बेरोजगारीचा विचार करुन उदगीर व जळकोटच्या एम.आय.डी.सी. चा प्रश्न मार्गी लावुन येथील बेरोजगार तरूणांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. त्यांच्या याच कामाची पावती म्हणून मतदार संघातील जनतेने दुस-यांदा त्यांना ९३ हजारापेक्षा जास्त मताधिक्य देवून विजयी केले. त्याच याच कार्याची दखल घेवुन त्यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार देवून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
या पुरस्कार वितरण समारंभास केंद्रीय मंत्री पियुस गोयल, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकमत मिडीया ग्रुपचे चेअरमन डाॅ.विजय दर्डा, समुहाचे एडिटर चीफ राजेंद्र दर्डा, ज्याईंट एम.डी. ऋषी दर्डा, आदीसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांना सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
****************

Post a Comment

0 Comments