उदगीर नगरपरिषदे कडून भारतीय स्वातंत्र्य दिनी लोकसहभागातूत पंधरा हजार वृक्षलागवड
उदगीर : काल दि.१५ ऑगस्ट २०२५ रोजी, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांच्या संकल्पनेतून 'हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र' उपक्रमा अंतर्गत हरित लातूर वृक्ष लागवड मोहिम राबविण्यात आली.
उदगीर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाने उदगीर शहरातील विविध सामाजिक संस्था, शाळा महाविद्यालय, महिला बचत गट, नागरिक, पदाधिकारी यांच्या सर्व सहकार्याने लोकसहभागातून शहरातील विविध ठिकाणी पंधरा हजार वृक्ष लागवड करण्यात आली.
सदर वृक्षारोपण मोहिमेत जलशुद्धीकरण केंद्र हकनाकवाडी, बनशेळकी तलाव परिसरात मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड करण्यात आली. तर उदयगिरी महाविद्यालय ते आरटीओ कार्यालय रस्त्याच्या दोन्ही बाजूने, मदनी मस्जिद कासिमुलोम ते म्हाडा जळकोट रोड रस्त्याच्या दोन्ही बाजूने, डी. एड. कॉलेज बाजूस स्मशानभुमी या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
सदर वृक्षारोपण करीता रोटरी क्लब, संघर्ष मित्र मंडळ, श्री नवयुवक व्यापारी गणेश मंडळ, रेल्वे संघर्ष समिती, कारवा फाउंडेशन, कृषी महाविद्यालय, संभाजी ब्रिगेड, रोटी कपडा बँक, आंतरभारती, जिव्हाळा ग्रुप, जेष्ठ नागरिक संघ, वसुंधरा हरित ग्रुप, जमाते इस्लामी चिल्ड्रन्स ऑर्गनायझेशन, ज्येष्ठ नागरिक संघ, जगत ज्योती महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान, राष्ट्रीय बसव दल, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत महिला बचतगट आदी सामाजिक संस्थांनी सक्रिय व मोठ्या संख्येने सहभागी नोंदवला.
सदर वृक्षारोपांमध्ये देशी प्रजातीचे करंज, सीसू, कडुलिंब, आंबा, आपटा, कांचन, जांभुळ, सीताफळ, भावा, चिंच, बेल, हेळा, आवळा, शेवगा, बांबू इ.रोपांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली.
या वृक्षारोपण मोहिमेस उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर यांच्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, भाजपाचे शहराध्यक्ष अमोल अनकल्ले, माजी नगरसेवक अनिल मुदाळे, सुधिर भोसले, मनोज पुदाले, दत्ता पाटील, गणेश गायकवाड, शशिकांत बनसोडे, नरसिंग शिंदे, शफी हाश्मी, राजकुमार चव्हाण, प्रदीप जोंधळे, प्रा.शिवशंकर वाणोळे, मधुमती कनशेट्टे, रवीप्रभा खादीवाले, उस्नबनू शेख, उर्मिला वाघमारे, मायाताई कांबळे आदींनी भेट देऊन त्यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.
सदर वृक्ष रुग्णांचे विशेष आकर्षण म्हणजे सर्व ठिकाणी हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र स्वाक्षरी मोहीम फलक, सेल्फी पॉइंट, सर्व सहभागी सामाजिक संस्थांचे सहभागिता बॅनर, मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण करण्यात आलेल्या वृक्षांना क्यू आर कोड लावण्यात आले. त्यामध्ये त्यावृक्ष प्रजातीची सविस्तर माहिती देण्यात आली.
तसेच उपस्थितांना हरित लातूर उपक्रमाची शपथ देण्यात आली.
सदर वृक्षारोपण मोहिम यशस्वी करण्यासाठी नोडल अधिकारी अनिल कुरे, प्रफुल अदावळे, महारुद्र गालट यांच्या सह सर्व विभाग प्रमुख, अधिकारी कर्मचारी, स्वच्छता मित्र यांनी परिश्रम घेतले.
0 Comments