श्री.श्री.१०८ श.ब्र. डॉ.शंभुलिंग शिवाचार्य महाराजांच्या ३० व्या श्रावणमास मौन तपोअनुष्ठानाचा पुणे येथे समारोप
पुणे : उदगीर येथील श्री गुरु हावगीस्वामी संस्थानचे अधिष्ठाता, अध्यात्म व शिवभक्तीचे प्रवर्तक श्री.श्री. १०८ श.ब्र. डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांचा ३० वा श्रावणमास मौन तपोअनुष्ठान सोहळा पुण्यात मोठ्या भक्तिभावाने व दिमाखात संपन्न झाला.
२८ जुलै ते १७ ऑगस्ट या २१ दिवसांच्या कालावधीत शिवपाठ, परमरहस्य ग्रंथ पारायण, इष्टलिंग महापूजा, दर्शन, भजनी मंडळांची सेवा, संगीत रुद्रगायन तसेच महाप्रसाद अशा अनेक धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले. या कालावधीत १६ ऑगस्ट रोजी विशेष दीक्षा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो शिवभक्तांनी दीक्षा घेऊन अध्यात्मिक साधनेचा स्विकार केला. या ऐतिहासिक तपोअनुष्ठानाचा सांगता सोहळा १७ ऑगस्ट रोजी पुणे येथे संपन्न झाला असून या समारोप कार्यक्रमास हिंदुत्वाची बुलंद तोफ
तथा पिंपरी चिंचवडचे आमदार महेशदादा लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या तपोअनुष्ठान सोहळ्यास उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी शुभेच्छा देवून विनोद कपाळे यांच्याशी संपर्क करुन सर्व भाविकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
याप्रसंगी बोलताना आ. महेश लांडगे यांनी, कार्यक्रमाचे कौतुक करत सनातन धर्म, शिवभक्ती आणि गुरुकृपा याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “हिंदुत्व ही केवळ एक विचारसरणी नसून ती आपली जीवनशैली आहे. सनातन धर्मातील अध्यात्म, साधना आणि तपश्चर्या ही आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे. अशा तपोअनुष्ठानांमुळे समाजात आत्मिक बळ निर्माण होते.” पुढे ते म्हणाले की, “शिवभक्ताने नेहमीच सदाचार, शिस्त आणि परमार्थाच्या मार्गावर राहिले पाहिजे. गुरुकृपा लाभली तर जीवनातील सर्व अडचणी सोप्या होतात आणि भक्तीचे खरे फळ प्राप्त होते.”
या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन उदगीरचे भुमीपुत्र व पुण्यातील नामांकित युवा उद्योजक विनोद कपाळे आणि त्यांचे सहकारी चंद्रकांत शेरे यांनी अत्यंत काटेकोरपणे केले. गेल्या २१ दिवसांपासून त्यांनी दिवस-रात्र अथक परिश्रम घेऊन संपूर्ण सोहळ्याचे यशस्वीरीत्या आयोजन केले. त्यांच्या सोबत पुणे व उदगीर येथील शेकडो शिष्य व भाविक कार्यरत होते. या काळात , आमदार महेशदादा लांडगे, नगरसेविका नम्रताताई योगेश लोंढे, योगेश लोंढे, निलेश बोराटे, माजी महापौर नितीन आप्पा काळजे , निखिल बोराडे ,नगरसेवक विकास डोळस,उद्योजक सुभाषअप्पा नेलगे , उद्योजक अजय मुंगडे ,उद्योजक राजकुमार पाटील ,तुषार वाघोरे , ॲड . महेश लोहारे ,सुनील शिंदे पाटील , कमलाकर अंकुलगे ,उद्धवजी महाराज, रामलिंग स्वामी ,श्याम सुंदर भट ,अजित खलुते ,उद्योजक प्रदीप चिंचणकर ,उद्योजक हंसराज बिरादार ,रवी हजनाळे , बसवराज मजगे, सुचित मजगे ,उमाकांत शेटे ,उद्योजक गणेश पटवारी, कुणाल तापकीर, सचिन स्वामी, नरसिंग मुळे,श्रीकृष्ण कानडे ,उमेश पाटील ,वीरबस्व मिरचे ,शिवप्रसाद स्वामी , उद्योजक सिद्धेश्वर शेटकार , काशिनाथ कपाळे , विनोद बिरादार , नारायण कागले , महेश चणगे , महेश आडे , राजकुमार स्वामी , सोमनाथ जाणापुरे, प्रदिप हिंगमिरे , सुधाकर अंकुलगे , चेतन शेटे, संतोष जावळे ,बबन बिरादार, नितीन उघडे , किरण बिरादार आदींनी विविध सेवा कार्यात सहभाग नोंदविला.
तब्बल 21 दिवस सुत्रसंचालनाची धुरा वीरभद्र स्वामी यांनी सांभाळली
तसेच अन्य अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहिले.
या तपोअनुष्ठान सोहळ्यात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र व तेलंगणा सिमाभागातील असंख्य भजनी मंडळांनी आपली सेवा बजावली. श्री गुरु हावगीस्वामी पुरोहित्यकार मंडळाने सादर केलेल्या संगीत रुद्रगायनाने सोहळ्याला विशेष आध्यात्मिक ऊर्जा मिळाली. सांगता समारंभानंतर हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
श्री गुरु हावगीस्वामी देवस्थान समिती उदगीर, पुणे येथील शिष्य-भाविक मंडळ, युवक मंडळ आणि महिला मंडळ यांच्या सहकार्याने हा ऐतिहासिक सोहळा यशस्वीरीत्या पार पडला. श्री.श्री. १०८ श.ब्र. डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांच्या ३० व्या श्रावणमास मौन तपोअनुष्ठानाने पुणे नगरीत भक्ती, अध्यात्म आणि शिवभक्तीचा अखंड संदेश पसरला असल्याचे भक्तांनी सांगितले.
*******
0 Comments