सरपंंचाच्या कौतुकास्पद कामगिरीमुळेच उदगीरचे नाव लौकीक : माजी क्रीडामंत्री आमदार बनसोडे
उदगीरला स्मार्ट तालुका करण्यासाठी प्रयत्न करणार
उदगीर : पर्यावरण संवर्धन करुन एकाच दिवशी ५ हजार वृक्ष लागवड करुन जिल्ह्यात नवा विक्रम बामणी ग्रामपंचायतीने केला. त्याचबरोबर स्वच्छता अभियान, पाणी गुणवत्ता, आरोग्य विभागात उत्कृष्ट कामगिरी, महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या माजी वसुंधरा अभियानात विभागात प्रथम येण्याचे काम बामणीच्या कर्तबगार सरपंचांनी केल्यामुळेच त्यांना दिल्लीच्या लालकिल्याच्या ध्वजारोहणाचे निमंत्रण मिळाले असुन सरपंंचाच्या कौतुकास्पद कामगिरीमुळेच उदगीरचे नाव लौकीक झाले असल्याचे मत माजी क्रीडामंत्री आमदार बनसोडे*
असल्याचे मत राज्याचे माजी क्रीडामंत्री आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले आहे.
ते उदगीर येथील रघुकुल मंगल कार्यालयात बामणीच्या आदर्श सरपंच सौ.प्रभावती राजकुमार बिरादार यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार गोविंदराव केंद्रे, बापुराव राठोड, भरत चामले, श्याम डावळे,बालाजी भोसले, सय्यद जाँनिमिया, समीर शेख, धनाजी मुळे, विलास खिंडे, दत्ता खंकरे, राजकुमार बिरादार, बालाजी पाटील, धर्मपाल देवशेट्टे, फैजुखाँ पठाण, अरविंद बिरादार, सोमॆश्वर पटवारी, बालाजी पाटील, शुभम केंद्रे, विनोद गुरमे, विजय होनराव, मारोती बिरादार, संगम टाले, सुदर्शन बिरादार, चंद्रशेखर पाटील,अभिजित साकोळकर आदींची यावेळी उपस्थित होती.
यावेळी पुढे बोलताना माजी क्रीडामंत्री आमदार संजय बनसोडे यांनी, स्वातंत्र्य दीनी दिल्लीच्या लाल किल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी बामणीच्या सरपंच श्रीमती बिरादार यांना आमंत्रित करण्यात आले.ही बाब उदगीरकरांसाठी अभिमानास्पद आहे.गावच्या विकासासाठी काम करणाऱ्या कर्तबगार व्यक्तींची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. बामणी गावचा कायापालट करुन हरित बामणी, स्वच्छ बामणी, पाणंदमुक्त बामणी या संकल्पना राबवुन केलेल्या विकासकामांचा हा गौरव आहे. याचा सर्व सरपंचांनी आदर्श घेवुन सर्वसामान्य जनतेसाठी स्वतः ला झोकून देवुन वार्ड पातळीपासुन काम करण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
यावेळी सरपंच श्रीमती बिरादार व श्री बिरादार यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देवुन नागरी सत्कार करण्यात आला.
दत्ता खंकरे यांनी प्रास्ताविक केले सुत्रसंचलन सचिन मंगनाळे यांनी
केले.
यावेळी तालुक्यातील सरपंच, चेअरमन, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*******************
0 Comments