GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

महापुरुषांच्या विचारातुन जीवन जगण्याची प्रेरणा मिळते : माजी मंत्री संजय बनसोडे

महापुरुषांच्या विचारातुन जीवन जगण्याची प्रेरणा मिळते : माजी मंत्री संजय बनसोडे

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी शोषितांच्या व्यथा साहित्यातुन मांडल्या

१ ऑगस्टला सार्वजनिक सु्ट्टी जाहिर करण्याची मागणी करणार

उदगीर : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना दलित साहित्याचे उद्गाते म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे होते. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात त्यांच्या साहित्याचे योगदान आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले, शाहु, आंबेडकर यांचे विचार आपल्या पुढच्या पिढीला दिले पाहिजेत. आपल्या सर्व महापुरुषांच्या विचारातुन आपल्याला जीवन जगण्याची प्रेरणा मिळत असल्याचे मत माजी मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
 
ते उदगीर शहरात आयोजीत साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा व चबुतरा बांधकाम करणे या भव्य भूमिपूजन सोहळा व साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या
१०५ व्या सार्वजनिक जयंती महोत्सव समिती उदगीरच्या वतीने आयोजीत कार्यक्रम बोलत होते.

यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास माजी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी माजी जि.प अध्यक्ष राहुल केंद्रे, बन्सीलाल कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिणीस समीर शेख, तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनिल सावळे, रामदास बेंबडे,
 शहराध्यक्ष अमोल अनकल्ले, कार्याध्यक्ष वसंत पाटील, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, शहराध्यक्षा मधुमती कनशेट्टे, अॅड. वर्षा कांबळे, प्रा.पंडित सुर्यवंशी, प्रा.शिवाजी देवनाळे, जवाहरलाल कांबळे, रवींद्र बेंद्रे, प्रा.बिभीषण मद्देवाड, प्रल्हाद येवरीकर, प्रा.गोविंद भालेराव, शिवाजी सुर्यवंशी, प्रकाश राठोड, बाळासाहेब मरलापल्ले, अनिल मुदाळे, राजकुमार चव्हाण, गणेश गायकवाड, प्रदीप जोंधळे, संजय गायकवाड, ज्ञानेश्वर बिरादार येणकीकर, पोलीस निरीक्षक दिलीप गाडे, रुपेंद्र चव्हाण,गणेश गायकवाड, सावन पस्तापुरे, नरसिंग शिंदे, राजु मुक्कवार, बाळासाहेब पाटोदे, विजय होनराव, रवींद्र बेंद्रे, अरविंद शिंदे, बालाजी रणदिवे, अजित कांबळे, राजकुमार चव्हाण, राम शिंदे, अमर सुर्यवंशी, सुलोचना जाधव, माया कांबळे, अरूणा चिमेगावे, राहुल सोनवणे, रविप्रभा खादीवाले, उर्मिला वाघमारे, शॆख हुस्ना बानो, संघशक्ती बलांडे, अविनाश गायकवाड, सतिश कांबळे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना ना. संजय बनसोडे यांनी, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे कार्य मोठे असुन समाजबांधवांच्या भावनेचा व मागणीचा विचार करुन त्यांना  ' भारतरत्न ' हा सर्वोच्च सन्मान देवून गौरव करावा अशी विनंती राज्य शासनाच्या वतीने ठराव केंद्राकडे पाठवावा अशी विनंती मी राज्याचे मुख्यमंत्री देवॆंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी शोषिंताच्या व्यथा साहित्यातुन मांडल्या व त्यांना न्याय दिला आहे.
उदगीर येथील समाजबांधवांच्या  सूचनेनुसारच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पंधरा फुटाचा पुर्णाकृती पुतळा उभारणार असुन मागील काळात जळकोट शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा पुर्णाकृती पुतळा उभारला आता उदगीर शहरात त्यांच्या नावाने भव्य स्मारक उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे.
चिरागनगरमध्ये अण्णाभाऊ साठेंचे स्मारक उभारणार आहे तर पुण्याला लहुजी साळवे यांचे स्मारक उभारत आहोत. बार्टीच्या तत्वावर अर्टीची स्थापना झाली असून यामुळे मातंग समाजातील तरुण मुलांना याचा फायदा होईल. भविष्यात उदगीर शहरात अण्णाभाऊ साठेंचा पुर्णाकृती पुतळा उभारुन पुतळ्या शेजारी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या नावाने म्युझियम, स्मारक व अभ्यासिकेसाठी १५ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला असुन त्याचे काम प्रगतीपथावर आहे.
 मागील काळात उदगीर मतदार संघात सामाजिक सलोखा ठेवुन उदगीर मतदार संघाचा विकास केला आहे. येत्या काळातही उदगीरला विकासाच्या माध्यामातून महाराष्ट्रात नंबर एकला आणणार असल्याची ग्वाही ना.बनसोडे यांनी उपस्थित समाजबांधवांना दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गालट यांनी केले तर आभार पप्पु गायकवाड यांनी मानले.

यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
********************

Post a Comment

0 Comments