GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी माजी सभापती बापुराव राठोड यांची सर्वानुमते निवड

ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी माजी सभापती बापुराव राठोड यांची सर्वानुमते निवड

उदगीर – बंजारा समाजाच्या प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची भव्य बैठक गांधीनगर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. देशभरातून आलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी माजी सभापती बापुराव राठोड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या बैठकीस संपूर्ण देशातील सर्व राज्यांतील बंजारा समाजातील प्रमुख प्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान महाराष्ट्रातील संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेऊन नवीन नेतृत्व निवडण्याचा निर्णय घेण्यात आला.
राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. टी.सी. राठोड यांनी उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने निवडीचे पत्र प्रदान करून बापुराव राठोड यांची नियुक्ती जाहीर केली. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील बंजारा समाज अधिक संघटित व सबलीकरणाच्या मार्गावर वाटचाल करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
बैठकीस के. जी. बंजारा (माजी सचिव, गुजरात), अमरसिंह तिलावत (माजी मंत्री, तेलंगणा), डी. जी. बंजारा (माजी पोलीस महासंचालक, गुजरात), जगन्नाथ राव (डी.आय.जी., हैदराबाद), राजु नाईक (माजी अध्यक्ष), बी. के. नाईक (माजी जिल्हाधिकारी), सिताराम नाईक (माजी खासदार), रमेश आर्या (दिल्ली), मोहनसिंग नाईक, रुपचंद राठोड (उपायुक्त), सुरेश बंजारा (राजस्थान), एस. पी. सिंग लभाणा (पंजाब), अशोक वडतिया (हरियाणा), जे. पी. पवार (दिल्ली), सदाशिव नाईक (छत्तीसगड), एन. टी. जाधव, धुपचंद राठोड, जगदीश पवार, मिलिंद पवार, धनराज राठोड आदी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली व एकमताने हा निर्णय घेण्यात आला.
निवडीनंतर आपल्या मनोगतात बापुराव राठोड म्हणाले, "ही जबाबदारी माझ्यासाठी सन्मानाची आणि समाजसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे. महाराष्ट्रातील बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, शिक्षण, रोजगार आणि सामाजिक एकात्मता यासाठी मी कटिबद्ध राहीन. युवकांना संघटित करून त्यांच्या क्षमतांचा योग्य उपयोग होईल, यासाठी विशेष योजना राबवू. ग्रामीण व शहरी भागातील बंजारा बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन. माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचे मी प्रामाणिकपणे पालन करीन.”
या निवडीनंतर बापुराव राठोड यांचे राजकीय, सामाजिक संस्था, विविध संघटना आणि विशेषतः बंजारा समाजाकडून हार्दिक अभिनंदन होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाच्या कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास सर्वत्र व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

0 Comments