GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

उदगीरचे कर्तव्यदक्ष तलाठी पंकज कांबळे यांचा सत्कार

उदगीरचे कर्तव्यदक्ष तलाठी पंकज कांबळे यांचा सत्कार 

उदगीर : उदगीर येथील कर्तव्यदक्ष तलाठी पंकज कांबळे यांनी केलेल्या उल्लेखनीय आणि प्रशंसनीय कार्याबद्दल महसूल दिनानिमित्त लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांच्या हस्ते उत्कृष्ट महसूल अधिकारी म्हणून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रभारी जिल्हा दंडाधिकारी लातूर शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उदगीर येथील उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांच्यासह महसूल प्रशासनातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. 
सतत हसमुख राहून गोरगरिबांच्या सेवेत करणारे आणि उत्स्फूर्तपणे आपल्या सेवेला वेळ देणारे तलाठी म्हणून उदगीरचे तलाठी पंकज कांबळे यांची ओळख आहे. विशेष बाब म्हणजे शासनाच्या लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी ते सतत अग्रेसर राहतात. त्यांच्या या कामाबद्दल यापूर्वीही अनेक वेळा त्यांना गौरविण्यात आले आहे. महसूल दिनाच्या निमित्त महसूल प्रशासनाने त्यांचा केलेला गौरव योग्य असून त्यांचा हा सन्मान झाल्याबद्दल उदगीर येथील अधिकारी,  कर्मचारी व मित्रपरिवारातुन त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments