GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

पंचायत समिती उदगीर येथे राष्ट्रीय पंचायत राज दिवस साजरा

पंचायत समिती उदगीर येथे राष्ट्रीय पंचायत राज दिवस साजरा

उदगीर : पंचायत समिती उदगीर येथे काल दि. 24 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिवस साजरा करण्यात आला.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून  जिल्हा पशुधन अधिकारी भुपेंद्र बोधनकर हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून  गटविकास अधिकारी प्रविण सुरडकर,  कृषी अधिकारी बालाजी केदासे,तालूका पशुधन अधिकारी घोणसीकर हे होते. या प्रसंगी प्रशासनाकडून  उल्लेखनीय कार्य केलेल्या ग्रामपंचायत अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. ते ग्रामपंचायत बामणीस सन 2024/25 चा स्मार्ट ग्राम स्पर्धेत उदगीर तालुक्यात प्रथम क्रमांक व माझी वसुंधरा अभियानात विभागात दुसरा क्रमांक  मिळाल्याबद्दल  ग्रामपंचायत अधिकारी संजय गुरमे व स्मार्ट ग्राम स्पर्धा सन 2023- 24 नळगीर ग्रामपंचायत प्रथम क्रमांक व संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात विभागात दुसरा क्रमांक मिळाल्याबद्दल ग्रामपंचायत अधिकारी बि . के. कांबळे, तसेच सन 2022-23 चा स्मार्ट ग्राम स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक ग्रामपंचायत अधिकारी वैजनाथ  मोरतळे तर विशेष कर वसूलीत तालुक्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल  ग्रामपंचायत अधिकारी शरद जाधव  व राष्ट्रीय पशुधन गणना व बर्ड फ्लू च्या साथीचे नियोजन वेळेत केल्याने पशुधन अधिकारी घोणसीकर या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक  विस्तार अधिकारी अंकुश बिरादार केले तर मार्गदर्शन   गटविकास अधिकारी प्रविण सुरडकर , कृषी अधिकारी बालाजी केदासे व शासनाच्या शंभर कलमी कार्यक्रमावर  बोधनकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बि. के.  कांबळे यांनी केले तर आभार पंचायत विस्तार अधिकारी दंडे यानी मानले. यावेळी पंचायत समितीतीचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments