उदगीरात माता रमाईची जयंती उत्साहात साजरी
उदगीर : त्यागमुर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त शहरातील भिम शौर्य युवा मंचच्या वतीने महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका कु.अस्मिता खरात छ. संभाजीनगर यांचा बुद्ध भिम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी मंत्री आ. संजय बनसोडे हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देविदास कांबळे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून भंन्ते नागसेनजी बोधी, विजयभैया निटुरे, डॉ. दीपक सोमवंशी , उषाताई कांबळे, प्रफुल्लकुमार उदगीरकर,शशिकांत बनसोडे, जानिमियाँ शेख, दत्ताजी पाटील, वर्षाताई कांबळे, वर्षा गायकवाड, मायाताई कांबळे वैशालीताई कांबळे, चंचलताई हुंगे, सतीश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन भीम शौर्य युवा मंचचे अध्यक्ष सुशीलकुमार शिंदे, राहुल कांबळे, अतुल घोडके, अमोल शृंगारे, नितीन गायकवाड, कपिल शिंदे, अतुल कांबळे, कपिल सोनकांबळे, नरेश चांदे, मनोज माणसे, राजकुमार माणसे, प्रफुल कांबळे, प्रकाश कांबळे, सागर सोनकांबळे, परमेश्वर बन , इत्यादीने केले होते. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने आंबेडकर प्रेमी जनतेने सहभाग नोंदविला होता.
0 Comments