GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ

इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ

 11 वी व 12वी च्या क्लासेसचा भव्य शुभारंभ

उदगीर : मागील 16 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात स्वतःला वाहून घेऊन शेकडो शैक्षणिक विक्रम व निकालाचा नवा इतिहास घडवविलेल्या प्रा.सिद्धेश्वर पटणे यांच्या इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसच्या वतीने विशाल फ़ंक्शन हॉल येथे हजारो विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. त्याच बरोबर नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या अकरावी व बारावीसाठीच्या नीट, जेईई, सीईटी, बोर्ड इत्यादी व इयत्ता पहिली ते दहावीच्या सीबीएसई क्लासेसचा भव्य शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापूरे हे होते तर उदघाटक म्हणून माजी आमदार गोविंद केंद्रे तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरतभाऊ चामले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बस्वराज पाटील कौळखेडकर, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती बापूराव राठोड, माजी नगरसेवक विजयकुमार चवळे, राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड, चंदरआण्णा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, फ़ॉरेस्ट ऑफिसर बालाजी मुदाळे, केमिस्ट्रीचे तज्ञ् प्रा.व्यंकट ढोबळे, माजी प्राचार्य चंद्रसेन मोहिते इत्यादी मनावर उपस्थित होते. या वेळी महाराष्ट्र शासनाचा जिल्हा युवा पुरस्कार मिळाल्याबद्दल युवा नेते कुणाल बागबंदे व बापूराव पटणे यांचा सत्कार करण्यात आला व दिल्ली येथील भारत सरकारचा यंग लीडर अवॉर्ड मिळविल्याबद्दल कु.वैष्णवी श्रीकांत पाटील हिचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा.सिद्धेश्वर पटणे यांनी केले त्यांनतर उपस्थित मान्यवरांची यथोचित भाषणे झाली व त्यांनतर दहावी बोर्ड, एनएमएमएस, स्कॉलरशिप, नवोदय अशा विविध परीक्षेत यश मिळविलेल्या 340 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय जामकर यांनी केले तर आभार प्रदर्शन क्लासेसचे सहसंचालक इंजि.परमेश्वर भोकरे यांनी केले.या कार्यक्रमासाठी हजरो विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments