मतदार संघातील राहिलेल्या विकास कामाचा आराखडा तयार करणार : माजी क्रीडामंत्री आ.संजय बनसोडे
सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक महिण्यात एक दिवस जनता दरबार भरवणार
जळकोट तालुक्याच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करा
जळकोट : मागील २५ वर्षापासुनचा जळकोट तालुक्याच्या विकासाचा बॅकलाॅग मी मागील मंत्री पदाच्या वर्षाच्या काळात भरुन काढुन जळकोट शहरासह तालुक्याचा कायापालट केला. या विकास कामाच्या जोरावरच आपण सर्वांनी मला पुन्हा एकदा आमदार केले. म्हणून मी परत एकदा आपल्या उदगीर - जळकोट मतदार संघातील राहिलेल्या विकास कामाचा आराखडा तयार करुन आपल्या मतदार संघाला एक नवी ओळख निर्माण करणार असल्याचे मत माजी क्रीडामंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते जळकोट तालुक्यातील जनतेच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
यावेळी माजी आमदार गोविंद केंद्रे,
नगराध्यक्षा प्रभावती कांबळे, उपनगराध्यक्ष मन्मथ किडे, सभापती विठ्ठल चव्हाण,
माजी जि.प. सदस्य रामराव राठोड, माजी जि.प. सदस्य संतोष तिडके, चंदन पाटील नागरगोजे, माजी नगरसेवक विजय निटुरे, धर्मपाल देवशेट्टे, सत्यवान पांडे, गोविंद भ्रमण्णा, संग्राम हासुळे पाटील, सोमेश्वर सोप्पा, उस्मान मोमीन, रमाकांत रायेवार,चंद्रकला रोट्टे, अर्जुन आगलावे, संगम टाले, अरविंद नागरगोजे,विश्वनाथ चाटे, पाशा शेख, दिपल आंब्रे, विनायक जाधव, गजानन दळवे, चंद्रशेखर पाटील, आकाश वाघमारे, नंदु नळंदवार, रावसाहेब पाटील, गजेंद्र किडे, मन्मथ बोधले, विजय होनराव, बालाजी बनसोडे, सूर्यकांत बोदले,सुरेखा गवळे, जान्हवी गवळे, माधव पाटील, रत्नाकर केंद्रे, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, जळकोटकरांच्या रेल्वेचा प्रश्न सोडवण्यासाठी मी पाठपुरावा करत असुन बोधन ते लातूर रोड ही रेल्वे जळकोट मार्गे व्हावी म्हणून मंत्रालयात कॅबिनेट मध्ये हा विषय मी घेतला आहे. केंद्र आणि राज्य सरकारनी पुढाकार घेवुन रेल्वेचाही प्रश्न मार्गी लागणार असुन मागील काळात तिरु नदीवरील बॅरेजेस झाले. भविष्यात उजवा आणि डावा कालवा करण्यासाठी शंभर कोटी रुपयाची तरतुद करणार आहे.
जळकोट येथे प्रशासकीय इमारत, शासकीय विश्रामगृह, मराठा भवन, लिंगायत भवन, बुध्द विहार, शादीखाना, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय, तिरु नदीवरील बॅरेजेस, महावितरणे कार्यालय, ग्रामीण रूग्णालयात,
महापुरुषांचे पुतळे, जळकोट शहराला राष्ट्रीय महामार्गाने जोडले, शेकडो रस्ते केले, विविध वाडी तांड्यावरील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवला, वाॅटरग्रीड योजना आणली. भविष्यात जळकोटच्या एम.आय.डी.सी. चा प्रश्न मार्गी लावुन येथील बेरोजगार तरूणांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा माझा निर्धार असुन जळकोट शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार आहे. जळकोट नगर पंचायतीची इमारत बांधकामासाठी ४ कोटी रु मंजूर केले असुन त्याचेही भुमीपुजन आपण लवकरच करणार असुन जळकोट तालुक्याच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करा असे आवाहन ही आ.संजय बनसोडे यांनी केले.
यावेळी जळकोट तालुक्यातील सोसायटीचे चेअरमन, सभासद, नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक, सरपंच, उपसरपंच व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******************************
0 Comments