कु.प्रतीक्षा शिवकुमार कांबळेची राष्ट्रीय लंगडी स्पर्धेसाठी निवड; सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव
उदगीर : मदुराई (तामिळनाडू) येथे होणाऱ्या राष्ट्रीय लंगडी स्पर्धेसाठी म.फुलेनगर उदगीर येथील प्रतीक्षा शिवकुमार कांबळे हिची वरिष्ठ गटात निवड झाली आहे. ही स्पर्धा ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत. शिर्डी येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्य निवड मंडळाने तिची निवड केली. राज्यसचिव चेतन पागावाड यांनी प्रतीक्षाला निवडीचे पत्र दिले.
यानिमित्त तिचे लंगडीचे जिल्हा सचिव जयराज धोतरे, मनपा जिल्हा सचिव मुजूब सय्यद, व्हॉलीबॉलचे राष्ट्रीय खेळाडू अशोक बुकटे, लंगडी प्रशिक्षक यशोदा पाटील, राज्यपंच साक्षी लोखंडे, क्रीडा शिक्षक ईस्माइल अत्तार, अश्लेषा गडदे यांनी अभिनंदन केले आहे.
चौकट ::::
मदुराई येथे होणाऱ्या लंगडी स्पर्धेसाठी उदगीर येथील प्रतीक्षा शिवकुमार कांबळे यांची सीनियर गटात निवड झाल्याबद्दल त्यांचा माजी नगरसेवक विजयकुमार चवळे व चवळे परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मित्रपरिवार उपस्थित होता.
***********************
0 Comments