GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र शासनाचा क्रीडा व युवक सेवा संचालयनाचा लातूर जिल्हा युवा पुरस्कार कुणाल बागबंदे यांना प्रदान

महाराष्ट्र शासनाचा क्रीडा व युवक सेवा संचालयनाचा लातूर जिल्हा युवा पुरस्कार कुणाल बागबंदे यांना प्रदान

उदगीर : क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा युवा पुरस्कार निवड समिती गठित असते जिल्हयाच्या युवा विकास काम मधे मोलाची कामगिरी करून जिल्हाचा मान वृध्दीगंत केल्याने उदगीर येथील युवा उद्योजक, युवा नेते कुणाल बागबंदे यांच्या कार्याची दखल घेत. महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सन २०२४- २०२५ या वर्षीचा जिल्हा युवा पुरस्कार पालकमंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, मुख्यकार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे आदी उपस्थित होते.
 त्यांच्या या निवडीचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
दर वर्षी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्यामार्फत खेळाडू व खेळास प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देत येतो. यंदाचा जिल्हा युवा पुरस्कार कुणाल बागबंदे यांना जाहीर झाला आहे. ते गेल्या अनेक वर्षापासून मुलांमध्ये विविध कलागुण वाढीस लागावेत यासाठी प्रयत्नशील आहे. क्रीकेट, खो-खो, यासारख्या खेळाच्या स्पर्धा व विविध शिबीरे , राबवून मुला- मुलींमध्ये खेळाडूवृत्ती वाढवून, जास्त- जास्त खेळाडू कसे तयार होतील यासाठी ते सतत प्रयत्न करीत असतात. युवा उद्योजक, खेळाडू व वृक्षप्रेमी म्हणून सर्वाना ते परिचित आहेत. कोविड काळात त्यांनी अनेक गरजू लोकांना किट वाटप केले, कोविड प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करुन देणे,  लहान बालकांना रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी सुवर्णप्राशन शिबिरे, रुग्णांना चांगली सुविधा मिळावी यासाठी डाॅक्टांच्या भेटी घेवून रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची मदत केली. कोविड काळात आपला जिव मुठीत घेवून काम करणाऱ्या सर्व कोरोना योध्दांचा सन्मान केला. प्रतिवर्षी महापुरुषांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम राबवने ईद निमिताने उपक्रम घेणे सर्वधर्मीय सामाजिक सलोखा राखण्याचा ते प्रयत्न करीत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments