GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

सर्व समाजातील नागरिकांना सोबत घेवुन मतदार संघाचा विकास करणार : माजी मंत्री आमदार संजय बनसोडे

सर्व समाजातील नागरिकांना सोबत घेवुन मतदार संघाचा विकास करणार : माजी मंत्री आमदार संजय बनसोडे
उदगीर : मागील पाच वर्षाच्या काळात उदगीर मतदारसंघाचा पूर्णपणे कायापालट केला असून उर्वरित राहिलेली कामे  येत्या पाच वर्षाच्या काळात मी पूर्ण करणार आहे. मतदार संघात जातीपातीचे राजकारण न करता मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी
सर्व समाजातील नागरिकांना सोबत घेवुन मतदार संघाचा विकास करणार असल्याचे मत माजी क्रीडामंत्री तथा उदगीर मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर तालुक्यातील दावणगाव येथे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात बोलत होते.

यावेळी माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, भाजपा नेते भगवानराव पाटील तळेगावकर, रामराव बिरादार, भरत चामले, बालाजी भोसले, धनाजी मुळे, उदयसिंह मुंडकर, ज्ञानेश्वर बिरादार बाळासाहेब पाटोदे, महेश बिरादार, विनोबा कांबळे, यशवंतराव ढगे, बालाजी फुले, रमेश भंडे , उमाजी मुळे, तानाजी फुले, मनोहर भंडे, व्यंकट हंगारगे, तानाजी भंडे, शरद बिरादार,  शिवाजी भोळे, विश्वनाथ भंडे, किशनराव बिरादार, कालिदास भंडे, विजय पताळे, बाबुराव कांबळे, नामदेव कांबळे, फरीद वाडीवाले, इस्माईल बागवान, चाँद बागवान, बबलू वाडीवाले, ईलाही पठाण, सोपान महापुरे, बालाजी हुरूसनाळे, कावेरी नितंगे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी, मतदारसंघातील जनतेने माझ्यावर विश्वास दाखवून मला सलग दुसऱ्यांदा निवडून देऊन आपली सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व मतदार बंधूंचे आभार व्यक्त करून निवडणुकीत दिलेल्या वचनाची पूर्ती करणार असल्याचे सांगून दावणगाव वासियांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा असुन आपण सर्वांनी विकासाला मत दिले आहे. मतदार संघातील कुठल्याही कामाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली.
यावेळी दावणगाव ग्रामस्थांच्या वतीने आमदार संजय बनसोडे यांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी दावणगावसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
************************

Post a Comment

0 Comments