GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

संस्कार व संस्कृतीची जोपासना करणारी शाळा म्हणजे आपली लाल बहादुर शास्त्री विद्यालय - माजी मंत्री आमदार संजय बनसोडे

संस्कार व संस्कृतीची जोपासना करणारी शाळा म्हणजे आपली लाल बहादुर शास्त्री विद्यालय - माजी मंत्री आमदार संजय बनसोडे

४५ व्या मराठवाडास्तरीय आंतरशालेय वादविवाद स्पर्धेचे उद्घाटन आ.बनसोडे यांच्या हस्ते संपन्न

उदगीर : विद्यार्थी हे आपल्या देशाचे भविष्य असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपल्या सर्व शाळा त्यांना प्रोत्साहित करतात मात्र विद्यार्थ्यांमध्ये संस्कार व संस्कृतीची जोपासना करणारी शाळा म्हणजे आपली लाल बहादुर शास्त्री विद्यालय असल्याचे मत माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर शहरातील लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात ४५ व्या मराठवाडास्तरीय स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री आंतरशालेय वाद विवाद स्पर्धेचे उद्घाटन आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

 या कार्यक्रमास भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य, माजी आ. गोविंदराव केंद्रे, मुख्याधिकारी सुंदर बोंदर, चंद्रकांत मुळे, शंकरराव लासुने, मधुकरराव वट्टमवार, सतनाप्पा हुरदळे, अंजलीताई नळगिरकर, शिवाजी बिराजदार, अंकुश मिरगुडे, बाळासाहेब केंद्रे, अरुण पत्की व्यंकटराव गुरमे, षणमुखानंद मठपती, श्रीपाद सीमंतकर यांची उपस्थिती होती.
     पुढे बोलताना आ. संजय बनसोडे यांनी, लालबहादूर शास्त्री विद्यालयात संस्कार व संस्कृतीची जोपासना केली जाते असे सांगून वक्तृत्व ही एक कला आहे. प्रभावी वक्तृत्व व दांडगा व्यासंग समाजामध्ये उठून दिसतो त्यासाठी अशा स्पर्धेचे आयोजन केले जाते याचे समाधान आहे. महाराष्ट्रात आपल्या उदगीरच्या शिक्षणाचा पॅटर्न गाजत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळांनी पुढाकार घेऊन कार्य करावे असे आव्हाने आमदार संजय बनसोडे यांनी केले.
        या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. डॉ. दुष्यंत कटारे,  प्रा. राजा कदम व  प्रा. डॉ. उषा धसवाडीकर काम पाहत आहेत.
     प्रातिनिधिक स्वरूपात निलेश फिरंगवाड व ज्ञानेश्वर बिरादार यांनी समान नागरी कायदा देश हितास साधक की बाधक या विषयाला अनुसरून अनुकूल व प्रतिकूल मत मांडले.
           उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक शंकरराव लासुणे, स्वागत व परिचय बालाजी पडलवार, वैयक्तिक गीत प्रीती शेंडे, सूत्रसंचालन लक्ष्मी चव्हाण व आभार बालासाहेब केंद्रे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता किरण नेमट यांच्या कल्याणमंत्राने झाली.
        कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  पर्यवेक्षक कृष्णा मारावार, किरण नेमट, माधव मठवाले, स्पर्धा प्रमुख एकनाथ राऊत, स्पर्धा सहप्रमुख अनिता मुळखेडे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
********************

Post a Comment

0 Comments