GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्र पुढे जाईल : माजी मंत्री आ.संजय बनसोडे

महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्र पुढे जाईल : माजी मंत्री आ.संजय बनसोडे

उदगीर : परवा झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उदगीर मतदार संघाचा भौतिक विकास केल्यानेच उदगीर मतदारसंघातील जनता आपल्याला मोठ्या मताधिक्याने निवडून दिली असून जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी मागच्यापेक्षा अधिक जोमाने काम करून मतदारसंघातील सर्व समस्या सोडवणार आहे. सर्वसामान्य नागरीकांना केंद्रबिंदू समजून आमचे महायुतीचे सरकार काम करत आहे.
महायुती सरकारच्या काळातच महाराष्ट्र पुढे जाईल असा विश्वास राज्याचे माजी क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.
ते उदगीर येथे आयोजीत भव्य नागरी सत्कार सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना बोलत होते.
उदगीर शहरात राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील व उदगीरचे भाग्यविधाते माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरतील विविध चौकात मोठ - मोठे हार घालुन , पुष्पवृष्टी करुन फटाके फोडुन जंगी सत्कार करण्यात आला.

यावेळी गुरूवर्य गहिनीनाथ महाराज औसेकर,
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी आ.गोविंदराव केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, माजी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, बस्वराज बागबंदे, जिल्हाध्यक्ष अफसर शेख, व्यंकटराव बेद्रे, रामचंद्र तिरुके, उषा कांबळे, महानंदा बहेनजी, रमेश अंबरखाने, माजी सभापती सिद्धेश्वर पाटील,
अॅड.गुलाबराव पटवारी, विधानसभा अध्यक्ष प्रा. प्रवीण भोळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, वसंत पाटील, शहर अध्यक्ष सय्यद जानीमियाँ, शशिकांत बनसोडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवशंकर धुप्पे, शहराध्यक्ष मनोज पुदाले, सुदर्शन मुंडे,
सुधीर भोसले, बसवराज पाटील कौळखेडकर, पंडित सुर्यवंशी, रामराव बिरादार, दिलीप गायकवाड, भरत चामले,
माजी नगरसेवक अनिल मुदाळे, नरसिंग शिंदे, भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा उत्तरा कलबुर्गे,अॅड. दिपाली औटे, डाॅ.भाग्यश्री घाळे, ब्रम्हाजी केंद्रे, श्याम डावळे, बाळासाहेब मरलापल्ले, उषा रोडगे, समीर शेख, शफी हाश्मी, रामराव बिरादार,  धनाजी मुळे, विजय निटुरे, अभिजित औटे, ब्रम्हाजी केंद्रे,  प्रदीप जोंधळे, अनिरुध्द गुरुडे, भास्कर पाटील, कुणाल बागबंदे, गिरीश उप्परबावडे, इब्राहिम शेख, पृथ्वीराज पाटील एकंबेकर, मधुमती कनशेट्टे, वैशाली कांबळे, काजल मिरजगावे, रिपाईचे सुशिलकुमार शिंदे, अॅड.प्रफुल्लकुमार उदगीरकर, मुकेश भालेराव, आदींसह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना आमदार बनसोडे यांनी, महायुती सरकारमध्ये दोन्ही टर्ममध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदा मला आणि आता बाबासाहेब पाटील यांना मंत्रिपदाची संधी दिली आहे. दोघांकडूनही जिल्ह्याच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आम्ही कटिबध्द असल्याचे माजी मंत्री आ. संजय बनसोडे म्हणाले. 
आपले शहर हे लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठे बाजारपेठ असलेले शहर असुन या शहराला एक ऐतिहासिक वारसा आहे आणि तो आपण सर्वांनी जपले पाहिजे. उदगीर हे संस्कृती जपणारे शहर असून भविष्यात उदगीरच्या विकासासाठी आपण काम करणार असल्याचे सांगितले.

प्रास्ताविक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बालाजी भोसले यांनी केले. सुत्रसंचालन व आभार प्रा. सिद्धेश्वर पटणे, अनिता येलमट्टे यांनी केले.
*************************
चौकट

मी सदैव उदगीरकरांच्या पाठीशी : मंत्री बाबासाहेब पाटील

मागील काळात माजी मंत्री संजय बनसोडे हे सरकारमध्ये मंत्री होते त्यांनी त्यांच्या कार्यकाळात उत्तम कार्य केले आहे . आपल्या जिल्ह्याला नेहमी न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी जे - जे करता येईल ते नक्की करणार असून आपली उदगीर शहर क्रीडा व शिक्षणाबरोबरच सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे अगोदरपासूनच माझे उदगीरवर प्रेम असल्याने पहिला सत्कार मी उदगीरचा स्वीकारला. यावेळी मला मंत्री पदाची संधी मिळाली त्याचा उपयोग जनतेच्या हितासाठी करून उदगीर करांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.
**********************

Post a Comment

0 Comments