GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

राधाबाई येडले यांना लातूर जिल्हा परिषदेचा जिल्हापूरस्कार जाहीर

राधाबाई येडले यांना लातूर जिल्हा परिषदेचा जिल्हापूरस्कार जाहीर

      लातूर : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील कानेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका राधाबाई हणमंतराव येडले - बंडले यांना सन 2023-24 चा लातूर जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांनी दि. 23 सप्टेंबर रोजी लातूर जिल्ह्यातील 11 प्राथमिक ,8 माध्यमिक व एका विशेष शिक्षक यांची निवड यादी प्रसिद्ध केली आहे. शिक्षकांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक व राष्ट्रीय योगदानातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल लातूर जिल्हा परिषदेच्या वतीने हा दिला जातो.राधाबाई येडले ह्या नेहमी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी व लोकसहभागातून शाळाविकासासाठी सतत धडपडत असतात.विविध नवोपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर सुधारणे, मुख्यमंत्री माझी शाळा - सुंदर शाळा अभियान, वाचन संस्कृती विकासासाठी महावाचन चळवळ, वाचनकट्टा, प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी फटाकेविरोधी अभियान, अंधश्रद्धा निर्मुलन, कन्या सुरक्षा कवच, एन एम एम एस परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, ग्रामस्वच्छता, राष्ट्रीय एकात्मता, विज्ञान प्रदर्शन, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत शाळेला यश मिळवून देण्याचे कार्य त्या सातत्याने करीत आहेत. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर बोरुळकर, माजी सरपंच महेंद्र बंडले, शाळेतील राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक सुशीलकुमार पांचाळ, चंद्रसेन ढगे, शरद येडले, विश्वनाथ लांडगे हवं उपस्थित होते. जिल्हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल राधाबाई येडले यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments