GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

श्री रत्नगंगा केमिस्ट्री क्लासेसच्या वतीने गुणवंताचा सत्कार

श्री रत्नगंगा केमिस्ट्री क्लासेसच्या वतीने गुणवंताचा सत्कार

उदगीर : येथील मागील पंचवीस वर्षापासून शेकडो डॉक्टर्स व हजारो  इंजिनियर्स घडविणाऱ्या प्रा.प्रदीप वीरकपाळे यांच्या श्रीरत्नगंगा केमिस्ट्री क्लासेसच्या वतीने क्लासेसच्या रौप्य  महोत्सवानिमित्त नीट, जेईई, सीईटी व बोर्ड परीक्षेत घवघवीत यश मिळविलेल्या गुणवंताचा सत्कार त्यांच्या पालकासह करण्यात आला .
या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी  उदगीरचे  माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे तर प्रमुख पाहुणे म्हणून वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष,सहकार महर्षी चंद्रकांत वैजापूरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर पाटील ,खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले, युवा उद्योजक रवी पाटील साकोळकर ,इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा.सिद्धेश्वर पटणे, प्रा.सलीम मुंजेवार ,प्रा.साजिद पठाण, प्रा.जीवन सूर्यवंशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व उपस्थित मान्यवरांचे शाल ,श्रीफळ ,पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आले.
या नंतर कार्यक्रमाचे प्रस्ताविक क्लासेसचे संचालक प्रा.प्रदीप वीरकपाळे यांनी केले.
त्यांनी प्रस्ताविकात असे सांगितले की मागील 25 वर्षांपूर्वी सुरू केलेले क्लासेसचे रोपटे आज 25 व्या वर्षी भव्य-दिव्य अशा वटवृक्षात  रूपांतरित झाले आहे आणि याचे सर्व श्रेय क्लासेसचा निकाल व विद्यार्थ्यांची मेहनत व  पालकांची साथ यास जाते. 
यावर्षी क्लासेसचे नीट मधून चार विद्यार्थी एमबीबीएस साठी पात्र झालेले आहेत त्याचबरोबर जेईई मधून सात विद्यार्थी पात्र झालेले आहेत एटानॉमस महाविद्यालयासाठी तीन विद्यार्थी पात्र झालेले आहेत.
केमिस्ट्री या विषयात 100 पैकी 100 गुण घेऊन महाराष्ट्रात सर्वप्रथम आलेली दोन विद्यार्थी.  त्याचबरोबर 63 विद्यार्थी इंजिनिअरिंग साठी पात्र झालेले आहेत. त्याचबरोबर बरेचसे विद्यार्थी डी. फार्मसी, बी. फार्मसी ,व्हेटर्नरी, फिशरी, पॉलिटेक्निक साठी पात्र झाले आहेत.
यावर्षी नीट मध्ये 675 गुण मिळवून पाटील दीपक दत्ता यांची लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज मुंबई (एम. बी. बी. एस) मध्ये प्रवेश मिळविला आहे 
सूर्यवंशी महिमा जीवन हिने नीट मध्ये 645 गुण घेऊन एम्स कॉलेज नागपूर (एम बी बी एस) मध्ये प्रवेश मिळविला आहे 
कृष्णा बस्वराज बोडेवार यांनी नीट मध्ये 634 गुण घेऊन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च लातूर ( एम बी बी एस) येथे प्रवेश मिळविला आहे.
बहिरेवार प्रकाश यांनी नीट मध्ये 608 गुण घेऊन गव्हर्नमेंट कॉलेज मिरज ( एमबीबीएस) कॉलेजमध्ये प्रवेश मिळविला आहे.
बोर्ड केमिस्ट्री या विषयात प्रिया प्रेमनाथ बिरादार व अमित सुनील रंडाळे या दोघांनी 100 पैकी 100 गुण घेऊन महाराष्ट्रात सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे. 
जायभाये तिरुपती यांनी सि ई टी मध्ये 99. 03 गुण संपादन करून महाराष्ट्रातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालय सी ओ इ पी पुणे येथे प्रवेश मिळविला आहे.अबू सुफियान शेख सलीम यांनी भारतातून रँक 1039 मिळून व्हीआयटी वेल्लोर येथे प्रवेशास पात्र झाले.
अध्यक्ष समारोपात माजी नगराध्यक्ष राजेश्वर जी निटुरे साहेब म्हणाले की माझ्या काळात जर वीरकपाळे सरांच्या सहवासात शिक्षण घेतलो असतो तर आज मी डॉक्टर किंवा इंजिनिअर राहिलो असतो असे शिक्षक मला भेटले नाहीत म्हणून आज मी राजकारणात सक्रिय आहे. शिक्षण क्षेत्रात उदगीरचे नाव अख्या महाराष्ट्रात रुजविण्यात वीरकपाळे सरांचे मोठे योगदान आहे. त्याचबरोबर श्री रत्नगंगा केमिस्ट्री क्लासेसचे विद्यार्थी भारतातील नामांकित त्याचबरोबर विदेशात देखील शिकत आहे हे आपल्यासाठी सार्थ अभिमानाची गोष्ट आहे. तरी विद्यार्थ्यांना लातूर जिल्ह्यातील केमिस्ट्रीचे किंग शिकवणीसाठी लाभले आहेत तरी त्यांचा आपण पुरेपूर उपयोग करून आपले जीवन मंगलमय बनवावे उदगीरच्या शैक्षणिक क्षेत्रात कपाळे यांचा सिंहाचा वाटा आहे. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.संजय जामकर यांनी केले 
यशस्वीतेसाठी सचिन बिरादार,राजकुमार बिरादार,अमर चिंचोळे,प्रमोद कामन्ना यांनी परिश्रम केले.

Post a Comment

0 Comments