उदगीर ते देगलूर या राष्ट्रीय महामार्गासाठी ८१० कोटी रुपये मंजूर
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांचे ना.बनसोडे यांनी मानले विशेष आभार
क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रयत्नाला यश
उदगीर : उदगीर मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रात्रंदिवस काम करणारे या भागाचे आमदार व महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर मतदारसंघाला जोडणारे सर्व रस्ते दर्जेदार करून उदगीरच्या विकासाला चालना देऊन दळणवळणासाठी रस्त्याच जाळ निर्माण केलं. उदगीर मतदार संघाला जोडणारे सर्व रस्ते पूर्ण झाले असून त्यातच आणखी एका रस्त्याची भर म्हणून उदगीर ते रवी मार्गे देगलूर हा महत्वाचा रस्ता मंजूर करावा म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी वेळोवेळी मागणी केली होती. त्यांच्या मागणीचा विचार करून केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी उदगीर - रावी - देगलूर या रस्त्यासाठी ८०९ कोटी ७७ लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.
दोन जिल्ह्याला जोडणारा हा अत्यंत महत्वाचा रस्ता मंजूर करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होती. उदगीर शहर हे तीन राज्याच्या सीमेवर असल्याने या भागात मोठी रहदारी व वाहतूक असते. या भागातील मोठ्या बाजारपेठेमुळे येथे देगलूर, निजामाबाद, मुक्रमबाद, करडखेल, मरखेल, बिलोली, मुखेड, रावी, हाळणी व इतर भागातुन नागरिकांची वर्दळ असायची मात्र देगलूरहुन उदगीरला ये - जा करण्यासाठी एक पदरी रस्ता असल्याने वाहनधारकांना मोठी अडचण निर्माण होत होती. म्हणून नागरिकांची गैरसोय लक्षात घेवुन उदगीरचे आमदार व राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे उदगीर ते देगलूर हा रस्ता करुन द्यावा म्हणून वेळोवेळी दिल्ली येथे ना.नितीन गडकरी यांची भेट घेवुन मागणी केली होती. त्यांच्या मागणीला यश आले असुन सदर रस्ता ना.गडकरी यांनी मंजूर केला आहे.
उदगीर, जळकोट तालुक्याच्या विकासासाठी मूलभूत सुविधा निर्मितीवर भर देवुन विविध रस्त्यांच्या कामांना गती देवून दळणवळण सुविधा बळकट केली. रस्ते दर्जेदार झाल्याने या भागाचा प्रवास सुखकर होवून विविध रोजगारांची निर्मिती झाली.
राष्ट्रीय महामार्गावर - ६३ हा उदगीर ते रावी मार्गे देगलुर सगरोळी हा रस्ता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नव्याने मंजूर केल्याने ना.नितीन गडकरी व या रस्त्याच्या कामासाठी उदगीर तालुक्याचे भुमीपुत्र अमोल पाटील कौळखेडकर यांचे देखील सहकार्य लाभल्याने क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी आभार व्यक्त केले आहेत.
उदगीर ते देगलूर हा रस्ता मंजूर केल्याने या भागातील नागरिकांनी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहेत.
*************************
0 Comments