क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातून मतदारसंघातील 54 लाभार्थ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता योजनेचा लाभ
विविध दुर्धर आजारावर मुख्यमंत्री सहाय्यता योजनेतून 41 लक्ष 45 हजाराचा निधी प्राप्त
उदगीर : उदगीर मतदार संघातील नागरिकांची आपल्या कुटुंबाप्रमाणे काळजी घेणारे या भागाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातून उदगीर मतदार संघातील 54 रुग्ण विविध आजाराने त्रस्त होते. संबंधित आजारावर खर्च करण्याची त्यांची परिस्थिती नव्हती. अत्यंत हलाकीची परिस्थिती असल्याने ते उपचार घेण्यासाठी सक्षम नसल्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 41 लक्ष 45 हजार रूपयाचा निधी उपलब्ध करून देवून रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. मतदार संघाच्या चौफेर विकासाबरोबरच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मी सदैव तत्पर असल्याची ग्वाही क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.
गेल्या पाच वर्षात उदगीर मतदार संघात विकासाचा डोंगर उभा करून नागरिकांना रस्ते, वीज, पाणी याबरोबरच आरोग्याच्या दर्जेदार सुविधा मतदारसंघात उपलब्ध करून देऊन क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर मतदारसंघाचा विकासाचा पॅटर्न सबंध महाराष्ट्रात गाजवला असून येत्या काळात राहिलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी सदैव जनतेच्या सेवेत त्यांचा ' जनसेवक ' म्हणून काम करणार असल्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना बोलताना सांगितले.
मुख्यमंत्री सहायता निधीतून कॅन्सर, किडणीचे आजार, अपघातात गंभीर दुखापत झालेले रुग्ण, किडणी ट्रान्सफर, ह्दयरोगासह विविध आजाराने त्रस्त असलेल्या 54 रुग्णावर उपचार करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचे आभार व्यक्त केले आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मतदार संघासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी उपलब्ध करुन दिल्याने क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
0 Comments