GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

उदगीर मतदार संघातील विविध विकास कामांसाठी १८ कोटींचा निधी मंजूर

उदगीर मतदार संघातील विविध विकास कामांसाठी १८ कोटींचा निधी मंजूर

क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांची माहिती

उदगीर : गेल्या चार वर्षात उदगीर मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासनाकडून तीन ते चार हजार कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी खेचून आणुन उदगीर मतदार संघाचा कायापालट केला. त्यातच भर म्हणून सद्या चालु असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीमध्ये उदगीर व जळकोट मतदार संघातील रस्ते व विविध इमारत बांधकामासाठी तब्बल १८ कोटींचा निधी मंजूर करुन घेतला असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.
यामध्ये रामा २४९ राज्य मार्ग अहमदपूर, शिरुर ताजबंद हाळी - उदगीर या रस्त्यावर जवळपास ९ लहान पुलांच्या बांधकाम व रुंदीकरण करण्यासाठी १० कोटी रुपये, उदगीर तालुक्यातील प्रतिमा २८ माळहिप्परगा कोदळी मांजरी अवलकोंडा ते उदगीर रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी १ कोटी रुपयाचा तर उदगीर तालुक्यातील रामा २४९ शेल्हाळ, तोंडचिर , मुर्की ते राज्य सरहद्द या प्रमुख रस्त्यामधील प्रमुख पुलांची पुनर्बांधणी करण्यासाठी ४ कोटी रुपये असे एकूण १५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
उदगीर तालुक्यातील मंडळ अधिकारी व तलाठी यांना उदगीर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी दुकान भाड्याने घेऊन तेथे कार्यालय स्थापन करून ग्रामीण भागातील जनतेच्या अडचणी सोडवण्याचे काम करावे लागत होते. ही बाब क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी उदगीर तालुक्यात ४ मंडळ कार्यालय व १६ तलाठी भवनाच्या बांधकामासाठी एकूण ३ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देऊन ग्रामीण भागातील जनतेची गैरसोय दुर केल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना क्रीडामंत्री संजय बनसोडे यांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहेत.

Post a Comment

0 Comments