जाती, धर्माला नाही तर देशाला मोठ करण्यासाठी महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांना विजयी करा : क्रीडा मंत्री संजय बनसोडे
महायुतीचा उमेदवार महामताधिक्याने विजयी होणार
उदगीर : देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी घेतला आहे. विरोधक जाती - पातीच राजकारण करत आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी जातीला आणि धर्माला मोठ न करता देशाला मोठ करा
आणि त्यासाठीच महायुतीचे लातूर लोकसभेचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांनाच आपण सर्वांनी मतदान करुन विजयी करण्याचे आवाहन क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी केले.
ते उदगीर तालुक्यातील डाऊळ येथे महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारार्थ वाढवणा जिल्हा परिषद अंतर्गंत विविध गावातील सरपंच, उपसरपंच, चेअरमन व महायुतीच्या प्रमुख पदाधिका-यांच्या बैठकीत बोलत होते.
यावेळी भाजपाचे नेते माजी आ.गोविंदराव केंद्रे, भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, तालुकाध्यक्ष बालाजी भोसले पाटील, विधानसभा अध्यक्ष प्रवीण भोळे, शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, प्रा.डाॅ.श्याम डावळे, माजी नगरसेवक फय्याज शेख, अनिल मुदाळे, इम्तियाज शेख, ब्रम्हाजी केंद्रे, संगम आष्टुरे, नागेश थोंटे, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी, मतदार संघातील जिल्हा परिषद सर्कलनुसार बैठका घेणार असुन परवाच हाळी - हंडरगुळीत पहिली बैठक संपन्न झाली आहे. यावेळी ही त्या परिसरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक घटकापर्यंत सुख सुविधा पुरविल्या. मागील १० वर्षाच्या काळात सर्वसामान्य घटकांचा विकास अतिशय वेगाने झाला. नरेंद्र मोदी यांचे विकसित भारत करण्याचे स्वप्न असुन आपण सर्वांनी साथ दिली तर ते निश्चितच पूर्णात्वास जाईल असा विश्वास वाटतो. म्हणून आपण सर्वांनी एकत्र येवून नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे लातूर लोकसभेचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांनाच मतदान करा असे आवाहन ना.बनसोडे यांनी केले.
याप्रसंगी माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, वसंत पाटील, गणेश गायकवाड, इब्राहिम देवर्जनकर, उदय ठाकुर, बालाजी देमगुंडे, प्रभाकर पाटील, रामकिशन जाधव,देविदास गुरमे, विकास मुसणे, संजीव केंद्रे, अजय गौशटवार, ज्ञानेश्वर भांगे, शुभम केंद्रे, धोंडीबा डावळे, दामोदर पाटील, लक्ष्मण डावळे, प्रभाकर डावळे, दिगंबर कुंडगीर, हणमंतराव डावळे, पंढरी पाटील, विश्वनाथ पाटील, दिगंबर पाटील, तानाजी डावळे, रामदास सुळे, रऊफ शेख, लक्ष्मण पाटील, संजीव हुंजे, बापूराव सुरवसे, बालाजी गायकवाड, धनाजी डावळे, नवनाथ मालवणे,शिवाजी माने,सुनिल कांवडे, माधव वडारे,संभाजी भालमारे,अमिर पठाण, आदी उपस्थित होते.
या बैठकीस डाऊळ, हिप्परगा, खेर्डा, गुर्ती, वाढवणा, देऊळवाडी, घोणसी, हकनकवाडी, एकुर्का, इस्मालपुर, कल्लुर, गुडसुर, बोरगाव, वाढवणा खु., हंडरगुळी, नावंदी आदी भागातील प्रमुख कार्यकर्ते , पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments