पी.टी.ए च्या उदगीर तालुका अध्यपदी प्रा.गोपाळकृष्ण घोडके तर सचिवपदी प्रा.पांडुरंग फड यांची निवड
उदगीर : येथील खाजगी कोचिंग क्लासेसच्या सर्व संचालकांची म्हणजेच पी.टी.ए ची बैठक रविवार दि.31/03/24 रोजी संपन्न होऊन या बैठकीत सर्वानुमते व अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संघटनेच्या अध्यक्षपदी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात एक आगळा-वेगळा ठसा उमटवलेले वक्तृत्व, कर्तत्व व नेत्रत्व यांचा त्रिवेणी संगम असलेले प्रा.गोपाळकृष्ण घोडके यांची निवड करण्यात आली.
याशिवाय या संघटनेच्या उपाध्यक्षपदी प्रा.नवाज मुंजेवार सचिवपदी प्रा.पांडुरंग फड तर कोषध्यक्षपदी प्रा.रामचंद्र बिरादार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या बैठकीला प्रा.सिद्धेश्वर पटणे, प्रा.अनिल बालुरकर, प्रा.सिद्राम शेटकार, प्रा.प्रदीप वीरकपाळे, प्रा.धनंजय पाटील, प्रा.अविनाश पाटील, प्रा.सुनील ढगे, प्रा.विष्णू गौडगावे, प्रा.संतोष चौधरी, प्रा.पांडुरंग काजबा, प्रा.संजय जामकर, प्रा.मल्लिकार्जुन होलसंबरे, प्रा.शिवाजी हंचनाळे, प्रा.निलेश मंगळूरे, प्रा.सुनील पटणे, प्रा.गंगाधर पाटील, प्रा.बालाजी बिरादार, प्रा.विश्वास टेकाळे, प्रा.नारायण शिंदे सर, प्रा.नंदिनी निटुरे, प्रा.सुनील गरड, प्रा.संतोष पाटील, प्रा. राजेय कुलकर्णी इत्यादी विविध क्लासेसचे तज्ञ् संचालक उपस्थित होते. ही निवड पुढील पाच वर्षासाठी करण्यात आली आहे. या निवडीबद्दल अध्यक्ष प्रा.गोपलाकृष्ण घोडके व नूतन सर्व पदाधिकाऱ्यांचा सर्व क्लासेस संचालकाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना प्रा.गोपाळकृष्ण घोडके म्हणाले की , उदगीर पिटीए चा पहिला अध्यक्ष मी होतो म्हणजेच या संघटनेचा पाया मी रचला मध्ये 3-4 वर्ष प्रा. सिद्धेश्वर पटणे यांनी सर्वांनाच सोबत घेऊन अतिशय चांगल्या प्रकारे संघटनेची इमारत थांबवली आता पुन्हा या संघटनेचा कळस योग्य व सक्षम रित्या चढवायची जिम्मेदारी माझ्यावर टाकलेली आहे तरी क्लासेस संचालकांच्या या विश्वासाला तडा जाऊ न देता अतिशय सक्षमपने संघटना चालवेन व कोणत्याच क्लासेस संचालकाला कसलीच अडचण येणार नाही याची पुरेपूर काळजी घेईन असा शब्द दिला. या निवडीबद्दल अध्यक्ष प्रा.गोपाळकृष्ण घोडके यांच्यासह सर्व नूतन पदाधिकाऱ्यांवर सर्व स्तरातून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
0 Comments