उशीरा लग्न आणि आनुवंशिक आजार यामुळे बालकात डाऊन सिंड्रोम आजाराची शक्यता पालकांनी जागरूक असणे महत्वाचे : डॉ. होटूळकर
उदगीर : उशीरा लग्न झालेल्या 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांमध्ये डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलाला जन्म देण्याचा धोका जास्त असतो. तसेच डाउन सिंड्रोम हा एक आनुवंशिक आजार आहे. हा आजार प्रामुख्याने मुलांमध्ये दिसून येतो. आनुवंशिक कारणांमुळे मुलांमध्ये काही शारीरिक दोष निर्माण होतात. वैद्यकीय क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. अशा तंत्रज्ञानाचा वापर करून या आजाराविषयीची तपासणी, निदान आणि उपचार शक्य आहेत. मात्र यासाठी पालकांनी विशेष जागरूक असणं गरजेचं आहे असे डॉ. होटूळकर यांनी सांगितले.
सक्षम दिव्यांग सेवा केंद्र उदगीर आणि कस्तुराबाई नर्सिंग स्कूल द्वारा जागतिक डाऊन सिंड्रोम दिन मातृभूमी प्रतिष्ठान च्या कस्तुराबाई नर्सिंग स्कुल मध्ये साजरा करण्यात आला .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य उषा कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून फिजिशियन डॉ.संगमेश्वर दाचावार, बालरोग तज्ञ डॉ.शिवकुमार होटूळकर, कान नाक घसा तज्ञ डॉ. संजय कुलकर्णी, प्रा.डॉ. रविकांत पाटील उपस्थित होते .
जागतिक डाऊन सिंड्रोम दिनानिमित्त आयोजित या जनजागृती कार्यक्रमाच्या प्रास्तविकात डॉ. संजय कुलकर्णी यांनी 'सक्षम' या राष्ट्रीय संघटनेची उद्दिष्टं, कार्यपद्धती आणि उदगीर येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या 'सक्षम दिव्यांग सेवा केंद्र' याविषयी माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बिभीषण माद्देवाड यांनी केले तर आभार प्रा.डॉ. रविकांत पाटील यांनी मानले . यावेळी रेखा रणक्षेत्रे , आकाश राठोड , रेखा रणक्षेत्रे , राहूल जाधव, उषा साताळकर यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments