GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

किडझी स्कुलचे "झाँकी हिंदुस्थान की" वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे

किडझी स्कुलचे "झाँकी हिंदुस्थान की" वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे 

चिमुकल्यावर उत्कृष्ट संस्कार करणारी संस्था म्हणजे किडझी स्कूल

उदगीर : येथील किड्झी स्कुलचे वार्षिक स्नेह संम्मेलन नुकतेच उत्साहात पार पडले. या कार्यकमाच्या अध्यक्ष कार्यकारी अभियंता गोविंदराव गुरुडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून धनंजय गुडसूरकर, सौ. अनिता येलमटे , डॉ. नितीन गुरुडे , शाळेच्या प्राचार्या सौ . स्वाती गुरुडे ,तसेच पालकांचे प्रतिनिधी म्हणुन माधव जानते व सौ. ज्योती जानते हे होते.
प्रतिवर्षीप्रमाणे वेग वेगळ्या थीम वर किड्झी चे स्नेह संमेलन पार पडत असते . ह्या वर्षीचे थीम 'झांकी हिदुस्थान की' हे होते . त्यामध्ये आपल्या भारत देशातील वेगवेगळ्या राज्यातील संस्कृतीच्या कला अविष्काराचे दर्शन व उत्कुष्ठ असे सादरीकरण शाळेच्या 
विद्यार्थ्यांनी केले तसेच आपल्या देशातील थोर स्वातंत्र्य वीरांचेही योगदान नृत्य कलेतुन दाखविण्यात आले. सकाळच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी व विद्यार्थ्यांच्या आईसाठी फॅनसी ड्रेसचे आयोजन करण्यात आलेले होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मनोज गुरुडे यांनी केले . विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्ते सोबत आपले कलागुण ही जोपासावेत असे प्रतिपादन गुडसूरकर यांनी मार्गदर्शनात सांगितले . विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी शाळे सोबत पालकांनी ही लक्ष द्यावे असे प्रतिपादन सौ . येलमट्टे यांनी केले . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ. स्वाती गुरुडे व प्रा. रामदास मलवाडे यांनी केले . कोरीओ ग्राफर म्हणून आकाश व अमित यांनी उत्कुष्ठ असे डान्स मुलांकडून बसवून घेतलेले होते . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. शिल्पा गिरी ,  आफ्रीन खुरेशी ,कल्पना कांबळे , सोनाली अनंतवाळ , भाग्यश्री पाटील , अनुराधा खानापूरे , रफीका दायमी ,राधा पांचाळ , सौ. वनिता , सुर्यभान केंद्रे , बाळू तांबाळकर यांचे सहकार्य लाभले .
कार्यक्रमामध्ये शाळेचे  विद्यार्थी व पालक मोठ्या संखेने उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Post a Comment

0 Comments