जय हिंद पब्लिक स्कूल मध्ये सात दिवसीय योग शिबिराचे आयोजन
उदगीर : येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जय हिंद पब्लिक स्कूलच्या क्रीडा विभाग व अखिल भारतीय योग शिक्षण महासंघ जिल्हा लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.सुधीर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यासाठी 23 मार्च ते 29 मार्च 2024 असे सात दिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. योग शिबिर बनवू परंपरा हे ध्येय घेऊन सदरील शिबीर आयोजित करण्यात आले.
सदरील शिबिरात अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाचे महाराष्ट्र राज्य सचिव संदीप पवार यांनी विद्यार्थ्याना शिथिलीकरण,आसने, प्राणायाम, ध्यान, संकल्प, पाठ, मणका, मान, उदरसंस्थेच्या अवयवांची कार्यक्षमता वाढवणाऱ्या ताणासन,वृक्षासन, हस्तपादासन,अर्धचक्रासन,त्रिकोणासन,भद्रासन, वज्रासन,वृष्ट्रासन,शशांकासन,वक्रासन,मकरासन, अर्धभूजंगासन, शलभासन, उत्तानपादासन,पवनमुक्तासन, शवासन आदी बाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
या शिबिराचे उद्घाटन स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या व्यवस्थापिका ज्योती स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जय हिंद पब्लिक स्कूल चे प्राचार्य संजय हट्टे, उपप्राचार्य सतिष वाघमारे,समन्वयक मनोरमा शास्त्री, उच्च माध्यमिक पर्यवेक्षक सविता बिरादार, माध्यमिक पर्यवेक्षक महेश कस्तुरे, मानव संसाधन विभागाच्या स्नेहा लांडगे यांची उपस्थिती होती.
या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुनम मेंडके व खुशी कोटुळे या विद्यार्थिनींनी केले. तर प्रास्ताविक क्रीडा विभाग प्रमुख संदीप पवार यानी केले. व आभार महेश कस्तुरे यांनी मानले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ लातूरचे जिल्हा सचिव नंदी धनुरे, शिवाजी धोंगडे,विजय सपाटे,सोमनाथ झेरकुंटे यांच्या सह विद्यार्थी मोठया प्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी निरामय आरोग्यासाठी नियमित साधनेचा संकल्प देखील केला.
0 Comments