भारत सरकारतर्फे घेण्यात आलेल्या NMMS परीक्षेत उदयगिरी अकॅडमीची विद्यार्थिनी श्वेता बिरादार उदगीर तालुक्यात सर्वप्रथम व इतर 22 विद्यार्थ्यांना घवघवीत यश
उदगीर : 8 वी इयत्तेतील मुलांसाठी MPSC, UPSC च्या धर्तीवर केंद्र शासनातर्फे घेण्यात येणारी NMMS EXAM परीक्षेत उदयगिरी अकॅडमीची विद्यार्थिनी कु.श्वेता बिरादार हिने 178 पैकी 141 गुण घेऊन उदगीर तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तसेच एक दोन नव्हे तर इतर तब्बल 22 विद्यार्थी या परीक्षेत पात्र ठरले. त्यात श्वेता बिरादार, धनुरे हर्षदा, पाटील ओमकार, केंद्रे संचिता, आलट अंजली, पांढरे रामेश्वर, पवार विजय, बिरादार रोहिणी, भोसले प्रथमेश, धमणे शिवानंद, धनश्री उत्कर्ष राहुल, पाटील प्रतिक्षा, बिरादार ऋषीकेश, सुर्यवंशी नवनाथ, धनशेट्टी रुद्राणी, समीक्षा आंब्रे, गवते रितेश, भालके अथर्व, मदने मारोती, भोसले प्रज्ञा, वसुधा डावळे. या पात्र विद्यार्थ्यांचा उदयगिरी अकॅडमीतर्फे फेटे बांधुन सत्कार करण्यात आला. पात्र झाल्यापैकी बहुतांश विद्यार्थी भारत सरकारतर्फे मिळणार्या रु.60,000 शिष्यवृत्तीस पात्र ठरतात.
या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार सौ. श्रद्धा पंडित आंब्रे( सेल्स मॅनेजर, सोलोमन कॉर्पोरेशन, तैवान), उदगीर आयकॉन कु. प्राजक्ता भांगे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी बोलताना विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याचा पाया शालेय जीवनातच घडतो आणि त्यासाठी उत्तम मार्गदर्शकाची गरज असते असे श्रद्धा आंब्रे म्हणाल्या. तर विद्यार्थ्यांनी स्वतः चा सर्वांगीण विकास घडवून आणावा तसेच मोठी स्वप्ने पाहून ती सत्यात आणण्यासाठी प्रचंड मेहनत करावी असे प्राजक्ता भांगे म्हणाल्या. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. खिंडे मॅडम उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदयगिरी अकॅडमीचे संचालक मार्गदर्शक प्रा. गोपाळकृष्ण घोडके यांनी केले तर प्रा.डॉ.धनंजय पाटील यांनी आभार व्यक्तकेले. प्रा. संतोष पाटील, प्रा. श्रीगण वंगवाड, प्रा. मीना हुरदाळे, प्रा. नंदिनी नीटूरे, प्रा. निवेदिता भंडारे इ. उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उदयगिरी अकॅडमीतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments