GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

कानेगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत जंतनाशक गोळ्यांचे वाटप

कानेगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत जंतनाशक गोळ्यांचे वाटप

उदगीर : राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त कानेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आरोग्य विभागाच्या वतीने जंतनाशक गोळ्यांचे करण्यात आले. यावेळी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील  साकोळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप मंत्रे, आरोग्य सेवक सचिन शिवणे, निखिल कांबळे,मुख्याध्यापक सुरेश बिरादार, सहशिक्षक सुशीलकुमार पांचाळ,प्रशांत जाधव, राधाबाई येडले, मीनाताई बंडले , गंगाधर बोरूळकर,चंद्रसेन ढगे,शरद येडले ,आशा कार्यकर्ती रेखा सुरवसे,कविता येडले,गोपाळ सोलंकर यांनी विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले.या गोळ्या विद्यार्थ्यांनी चाऊन खाल्या. जंत नियंत्रणाच्या गोळी बरोबर जंतापासून बचाव करण्यासाठी नखे स्वच्छ ठेवावेत व नियमित कापावेत, नेहमी स्वच्छ पाणी प्यावे ,खाण्याचे पदार्थ झाकून ठेवावेत, स्वच्छ पाण्याने फळे व भाज्या धुवाव्यात, सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, पायात बूट- चप्पल नेहमी वापरावे ,उघड्यावर शौचास बसू नये ,नेहमीच शौचालयाचा वापर करावा, आपले हात साबणाने स्वच्छ धुवावे' विशेषतः जेवणाआधी आणि शौचावून आल्यानंतर आपले हात साबणाने स्वच्छ धुवावेत या बाबीची काळजी घेण्याच्या सूचना सुशीलकुमार पांचाळ यांनी दिल्या. मुलांमध्ये जंताच्या प्रादुर्भावामुळे कुपोषण आणि रक्तक्षय होऊन त्यांना सतत थकवा जाणवतो, त्यांची शारीरिक वाढ व विकास पूर्णतः होत नाही यासाठी १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळ्या निशुल्क दिल्या जातात. यावेळी 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या अभियानांतर्गत डॉक्टर मंत्री यांनी प्रथमोपचार पेटी,वाढत्या वयासोबत होणारा लठ्ठपणा, डोळ्यांचे आजार आणि मासिक पाळी व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले, तसेच रेणुकाई ऍग्रो फूड प्रोसेसिंग कंपनी साकोळच्या संचालिका मीनाताई बंडले यांनी विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन याविषयी मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments