GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन आपण जीवनात वाटचाल करावी : क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन आपण जीवनात वाटचाल करावी : क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

महाराजांच्या जयघोषाणे आपणास ऊर्जा मिळते

उदगीर : छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आजच्या तरुण पिढीने डोळ्यासमोर ठेवुन जीवनात मार्गक्रमण केले तर आपण एक आदर्श व्यक्ती म्हणून नक्कीच समाजासमोर उभे राहून यश संपादन करु शकतो म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा
 आदर्श डोळ्यासमोर ठेवुन आपण वाटचाल करावी असे मत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.

ते उदगीर शहर व तालुक्यातील विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजीत कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.

यावेळी माजी आ.गोविंद केंद्रे, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत, तहसीलदार राम बोरगावकर, मुख्याधिकारी सुंदर बोंदर, माजी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे,
माजी सभापती सिध्देश्वर मुन्ना पाटील,
 सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज एकंबेकर, सुधीर भोसले, मनोज पुदाले, सावन पस्तापुरे, श्याम डावळे,  उमाकांत तपशाळे, उदय मुंडकर, अजित पाटील, सुदर्शन मुंडे, पो.नि. करण सोनकवडे, डाॅ.दत्ता पाटील, अमोल निडवदे, समीर शेख, जानीमियाँ सय्यद, समद शेख, कुणाल बागबंदे, दत्ता पाटील, शहाजी पाटील तळेगावकर, मदन पाटील, बिपीन पाटील, चंद्रकांत टेंगटोल, अंकुश ताटपल्ले, बबिता भोसले, उषाकिरण बिरादार, प्रतिभा मुळे, आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उदगीर शहरात सकाळी ८ वाजता महाराजांना अभिवादन केले. यावेळी
शिवजन्मोत्सवानिमित्त बाळ शिवबाच्या पाळण्याचा कार्यक्रम झाला त्यानंतर
भव्य अशा शिवकालीन देखाव्याची मिरवणुक व मोटारसायकल रॅली काढण्यात आली . छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मतदार संघातील कोदळी, घोणसी व जळकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी बोलताना ना.संजय बनसोडे यांनी, 
उदगीर शहरात मराठा भवन उभारणीसाठी १० कोटी रुपयाचा निधी, छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवनासाठी २१ कोटी तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने महाप्रवेशाव्दारासाठी दिड कोटी, मराठा मुलांच्या वसतीगृहासाठी १४७ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला. मराठा समाजाच्या 
स्मशानभुमीचा प्रश्न सोडवला. मतदार संघाचा विकास करताना  सर्वजाती धर्माला सोबत घेवुन न्याय दिला. आता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन घेवुन आरक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे ना.संजय बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी नागरीक व तरुण समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तरुणाईला साद घालत ना.संजय बनसोडे यांचा मोटारसायकलवरुन शहरात फेरफटका

उदगीर शहरात तरूणांनी आयोजीत केलेल्या मोटारसायकल रॅलीला साथ देत क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी मोटारसायकल रॅलीत प्रत्यक्ष सहभागी होवुन तरूणांचा उत्साह वाढवुन छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नांदेड नाक्यापर्यंत मोटारसायकलवर हातात भगवा झेंडा घेवुन महाराजांचा जयघोष करत शहरात फेरफटका मारला. यावेळी हजारो तरुण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments