GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

जागतिक सूर्य नमस्कार स्पर्धेत जय हिंद पब्लिक स्कूलचे यश

जागतिक सूर्य नमस्कार स्पर्धेत जय हिंद पब्लिक स्कूलचे यश 

उदगीर : येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जय हिंद पब्लिक स्कूल च्या विद्यार्थिनीनी जिल्हा परिषदेच्या मैदानावर ज्येष्ठ नागरिक संघ व पतंजली योग समिती उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जागतिक सूर्य नमस्कार स्पर्धेत विद्यार्थिनीनी तालबद्ध, शिस्तीत अचुक असे सूर्य नमस्कार करुन सर्वाना अचंबित करीत सर्वांचे लक्ष वेधून घेत घवघवीत यश मिळवले. 
  सदरील जागतिक सूर्य नमस्कार स्पर्धेत 21 शाळांनी  सहभाग घेतला.शाळांचे क्रीडा शिक्षक व 2000 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यात जय हिंद पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनीनी यश संपादन केले.
    विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. सुधीर जगताप, संस्थेच्या व्यवस्थापिका ज्योती स्वामी,उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत  संस्थेच्या व्यवस्थापिका ज्योती स्वामी,प्राचार्य संजय हट्टे, नॅबेटच्या समन्वयक मनोरमा शास्त्री, उपप्राचार्य सतिश वाघमारे, रासेयोचे  कार्यक्रम अधिकारी प्रा.अमर तांदळे, पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा.राहुल पुंडगे, माध्यमिक पर्यवेक्षक महेश कस्तुरे, क्रीडा शिक्षक तथा राष्ट्रीय पंच संदीप पवार, स्नेहा लांडगे, पवन भालेराव, उषा सोमवंशी, यांच्या सह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले

Post a Comment

0 Comments