GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

जगाला बुध्दांच्या विचाराची गरज : खासदार सुधाकर श्रृंगारे

जगाला बुध्दांच्या विचाराची गरज : खासदार सुधाकर श्रृंगारे

खा.सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रयत्नातुन तब्बल १५ वर्षानंतर उदगीर शहरात झाली धम्म परिषद 

उदगीर : सद्याचे युग हे धावपळीचे युग असुन प्रत्येक जन आपापल्या कार्यात मग्न आहे. या एकविसाव्या शतकात आपण वावरत असताना तथागत भगवान बुध्दांच्या विचारावर आपण सर्व जन चालले पाहिजे तरच आपल्याला जीवनात सुख समृद्धी येईल आपण दररोज नवनवीन घटना ऐकतो विविध क्राईमच्या माध्यामातून तरुणाई भरकटत चालली आहे. आपल्या पुढच्या पिढीला चांगले संस्कार द्यायचे असतील तर आपल्याला व जगाला बुध्दांच्या विचाराची गरज असल्याचे प्रतिपादन लातूरचे खा.सुधाकर श्रृंगारे यांनी व्यक्त केले.

ते उदगीर शहरात पोर्णिमेनिमित्त आयोजीत बौद्ध धम्म परिषदेत धम्म पिठावरून बोलत होते.

यावेळी धम्म पिठावर उत्तरप्रदेशचे भंते इंदवंश महाथेरो, लेह लडाखचे भंते फुलजंग लामा, सिरसाळा येथील भंते पंय्यातिस्स महाथेरो, अहमदपुरचे भंते महाविरो थेरो, परभणीचे भंते मुदितानंद थेरो, लातूरचे भंते पय्यानंद थेरो, धम्म परिषदेचे निमंत्रक तथा उदगीरचे भंते नागसेन बोधी, किल्लारीचे भंते धम्मसार, खरोसा येथील भंते सुमेधनागसेन आदी उपस्थित होते.
या धम्म परिषदेत व सर्व भंतेजींनी उपस्थित समाजबांधवांना धम्मदेसना दिली.

पुढे बोलताना खा.सुधाकर श्रृंगारे यांनी, 
आपल्याला चांगले जीवन जगायचे असेल तर बुध्द वाचला पाहिजे आणि बुध्दांचे विचार आपण सर्वांनी अंगीकारले तरच आपली प्रगती असुन विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुध्द आणि धम्म दिला त्याचे अनुकरण आपण सर्वांनी करुन आपले जीवन सुखी करावे. समाजाला आज शिक्षणाची व एक संघ राहण्याची गरज असुन मी आणि या भागाचे आमदार तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे  आम्ही दोघेही बुध्दिष्ट आहोत आम्ही तुमच्याच रक्ताचे असुन समाजासाठी आम्ही कधीही आपल्यासोबत असल्याचे सांगितले. मागील काळात म्हणजे सम्राट अशोकाच्या काळात धम्म वाढला होता. आता या काळातही 
धम्म वाढला पाहिजे म्हणून मी प्रयत्न करणार असल्याचे खा.श्रृंगारे यांनी सांगितले.
या धम्म परिषदेनंतर सुप्रसिध्द गायिका मंजुषा शिंदे पुणे, सपना खरात अकोला यांचा गायनाचा तर भारतीय महिला शाहीरी सीमाताई पाटील व संगीतकार जाॅली मोरे यांचा तुफान शाहिरी जलसा झाला.
सुत्रसंचलन प्रा.बालाजी आचार्य अहमदपूर यांनी केले.
या धम्म परिषदेचे आयोजन खा.सुधाकर श्रृगांरे यांनी केले होते.यावेळी तालुक्यातील धम्म बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments