संत सावता माळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनामध्ये यश
उदगीर : देवर्जन येथे गंगाधरराव साकोळकर पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे उदगीर मराठी केंद्रांतर्गत विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आली होती. या प्रदर्शनामध्ये एकूण 11 माध्यमिक व 11 प्राथमिक शाळांनी आपला सहभाग नोंदवलेला होता. यामध्ये संत सावता माळी माध्यमिक विद्यालय दावणगाव शाळेचा संपूर्ण केंद्रांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झाला. या यशामध्ये सर्वात मोठा वाटा शाळेचे विज्ञान शिक्षक मच्छिंद्र कांबळे व हा प्रयोग ज्यांनी आपल्या चांगल्या सादरीकरणामुळे नोंद घेण्यास भाग पाडला. त्या इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी प्रतीक्षा पाटील,परमेश्वरी भंडे व प्रणिता बळदे यांनी सादरी करण करून केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष बालाजीराव फुले व सचिव तानाजीराव फुले, शाळेचे मुख्याध्यापक शिवहार रोडगे यांच्यासह शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.
0 Comments