उदगीरमध्ये जागृतिक मृदा दिन उत्साहात साजरा
उदगीर सायकलिंग क्लबच्या वतीने ‘माती वाचवा चळवळ’ साठी सायकल रॅलीच्या आयोजन
उदगीर : माती जीवनासाठी महत्त्वाची आहे. कारण ती अन्न, वस्त्र, निवारा आणि औषध यासह जीवनाच्या चार प्रमुख साधनांचा स्रोत आहे. त्यामुळे मातीचे संवर्धन आवश्यक आहे. 45 वर्षांपूर्वी माती वाचवा चळवळ सुरू झाली. दरवर्षी ५ डिसेंबर रोजी 'जागतिक मृदा दिन' (World Soil Day) साजरा केला जातो.उदगीर येथे उदगीर सायकलिंग क्लबच्या वतीने शहरात आज सायकल रॅली काढून माती वाचविण्याचे आवाहन करण्यात आले.
झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे येणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकण्याचाही या दिवसाचा उद्देश आहे. मानवाच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम, पर्यावरणाचा ऱ्हास आणि अशा प्रकारच्या इतर अनेक कारणांमुळे मृदेची झीज मोठ्या प्रमाणावर होतेय. त्यामुळे यासंदर्भात जागरुकता करण्याच्या दृष्टीने 2013 साली सयुंक्त राष्ट्राच्या महासभेत 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिवस साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला. सुमारे 45 वर्षांपूर्वी भारतात ‘माती वाचवा चळवळ’ सुरू झाली.
या सायकल रॅलीत उदगीर सायकलिंग क्लबचे 50 सदस्य सहभागी झाले होते.
0 Comments