GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

राजीव गांधी आय. टी. आय. उदगीर चे जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शन मध्ये मिनी यु. पी. एस मॉडेलची विभागीय साठी निवड

राजीव गांधी आय. टी. आय. उदगीर चे जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शन मध्ये मिनी यु. पी. एस मॉडेलची विभागीय साठी निवड

 उदगीर : लातूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शन मध्ये राजीव गांधी 
औद्योगिक प्रशिक्षण संस्था उदगीरचे मिनी यू .पी . एस  Mini UPS मॉडेल ची निवड विभागीय स्तरासाठी झालेली आहे. या मध्ये जिल्हास्तरावर एकूण 52 मॉडेल हे तंत्रप्रदर्शनासाठी आलेले होते. यापैकी 7 इंजिनीरिंग व 3 नॉन इंजिनीरिंग मॉडेलची निवड करण्यात आलेली आहे. त्यामध्ये राजीव गांधी आय.टी. आय. उदगीर मधील मिनी यू. पी एस. ह्या इंजिनीरिंग मॉडेलची निवड झालेली असून त्याना विभागीय स्तरावर तंत्रप्रदर्शनची संधी मिळालेली आहे. हे यश मिळवण्यासाठी विजतंत्री मधील अक्षय राजुरे, अमित पंचगल्ले, समीर बागवान,हरिओम लाळे,विष्णूकांत आवलकोंडे, आदित्य बोळेगावे, प्रवीण पवार आदी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतली व त्यांना शिल्प निदेशक कोंडेकर जी. बी., पंडित हलगरे, प्राचार्या मरशीवने पी. एम. आदींचे मार्गदर्शन लाभले.
यायशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष बापूराव राठोड , सचिव अमित राठोड, प्राचार्य गाडेकर व्ही. के, प्राचार्या मरशीवने पी.एम. यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments