जय हिंद पब्लिक स्कूलमध्ये मुलींसाठी विशेष सेमिनारचे आयोजन
उदगीर : येथील जय हिंद पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज तसेच 'इनरव्हील क्लब' उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 6 जानेवारी रोजी 6 वी ते 12 वी वर्गात शिकणाऱ्या मुलींसाठी 'मासिक धर्म स्वच्छ्ता जागरूकता' या विषयावर विशेष सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या सेमिनार मध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंगलाई हॉस्पिटल व मॅटनिटी होम उदगीर येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ.सुप्रिया जगताप उपस्थित होत्या.
सदरील सेमिनारचे आयोजन स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुधीर जगताप यांनी केले. यावेळी संस्थेच्या व्यवस्थापिका ज्योती स्वामी, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा स्वाती गुरुडे, सचिव मानसी चन्नावार,सुप्रसिद्ध भुलतज्ञ डॉ. निलेश कुमार जगताप, जय हिंद पब्लिक स्कूलचे प्राचार्य संजय हट्टे, नॅबेटच्या समन्वयक मनोरमा शास्त्री, जय हिंद पब्लिक स्कूलचे उपप्राचार्य सतिश वाघमारे, डॉ.प्रियंका राठोड, मिरा चाबुले, नवल मसुरे, दत्ता कदम, स्नेहा लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सेमिनार मध्ये मार्गदर्शन करताना डॉ. सुप्रिया जगताप म्हणाल्या की,मासिक पाळी येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.त्यामुळे कसली ही भीती न बाळगता मुलींनी आपले शारीरिक व मानसिक आरोग्य जपणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता या काळात स्वतः स्वतःला जपणे हाच एकमेव उपचार आहे. त्यामुळे या काळात मुलींनी काय करावे, काय करू नये हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. असे ही त्या म्हणाल्या. तसेच त्यांनी विविध उदाहरण देत मुलींना त्यांच्या प्रश्नांचे उत्तरे देखील दिली.
सदरील सेमिनारचे सूत्रसंचालन व आभार नॅबेटच्या समन्वयक मनोरमा शास्त्री यांनी मांडले. हे सेमिनार यशस्वी करण्यासाठी इनरव्हील क्लबचे सर्व पदाधिकारी व जय हिंद पब्लिक स्कूलच्या सर्व शिक्षिका यांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठया संख्येनी मुली उपस्थित होत्या.
0 Comments