उदगीर - जळकोट तालुक्यातील रस्त्यांसाठी ५५ कोटी रुपयाचा निधी मंजुर
क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांची माहिती
उदगीर : तालुक्यातील नागरिकांना शहरात ये - जा करण्यासाठी अडचण निर्माण होत होती. म्हणून ग्रामीण भागातील नागरीकांनी ना.संजय बनसोडे यांच्याकडे रस्ता करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीचा विचार करुन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पामध्ये मतदार संघातील रस्त्यासाठी तब्बल ५५ कोटी ५४ लक्ष रुपयाचा निधी मंजुर करण्यात आल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.
मतदार संघाचा चौफेर विकास करताना
महापुरुषांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण, शहरातील शासकीय कार्यालयाच्या इमारती, प्रशाकीय इमारत, महसूल कर्मचा-यांचे निवासस्थान, पोलीस वसाहत, शादीखाना, बौध्दविहार, विविध सभागृहासह अंतर्गंत रस्ते, स्ट्रीट लाईट, पाणीपुरवठ्याची योजना, यांच्यासह मतदार संघाला जोडणारे रस्ते पूर्ण झाले असुन भविष्यात ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या लक्षात घेवुन त्यांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणारे ना.संजय बनसोडे यांनी ग्रामीण भागातील नागरीकांना शहरात ये - जा करण्यासाठी उदगीर तालुक्यातील राममा ३६१ ते नळेगांव करडखेल उदगीर रस्ता राममा ६३ वरील मलकापुर गांवाजवळील रेल्वे उडडान पुलांच्या सेवा रस्त्याची बंदीस्त नालीसह सुधारणा करणे उदगीर नळेगांव रस्त्यावरील मलकापूर एस. टी .वकॉलनी जवळील रेल्वे उड्डान पुलाच्या दोन्ही बाजुचे सेवारस्ते व बंदीस्त कॉक्रीट नालीचे काम करण्यासाठी ४ कोटी ८० लक्ष रु, उदगीर तालुक्यातील प्रजिमा-४० सुगांव हिप्पळगांव- थेरगांव-रामा २४०-शिरुर अनंतपाळ-दैठणा-देवर्जन-शेकापूर प्रमुख जिल्हा मार्ग-३७ पर्यंत रस्ता 'प्रमुख जिल्हा मार्ग ३८, कि.मी ३८/५०० ते ३९/८०० रस्त्याची सुधारणा करण्यासाठी २ कोटी ३० लक्ष रु., उदगीर तालुक्यातील रामा २५१ ते जगळपुर कुमठा शिवणखेड रामा २४९ उमरगा मन्ना कुमठा खु. भाकसखेडा ते प्रजिमा ३८ रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग २६, कि.मी ३१/५०० ते ४२/०० रस्त्याच्या कामासाठी १२ कोटी ६० लक्ष रु., उदगीर तालुक्यातील प्रजिमा-४० ते सुगांव हिप्पळगांव थेरगांव रामा-४० ते शिरूर अनंतपाळ दैठणा देवर्जन शेकापूर ते प्रजिमा- ३७ रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग ३८, कि.मी १६/६०० येथे शंभु उमरगा गावाजवळ लहान पुलाचे बांधकाम करण्यासाठी ९७ लक्ष ८५ हजार रु, उदगीर तालुक्यातील राममा-50-शेल्हाळ-तों-मुर्की ते राज्यसरहद्द रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग ३४, कि.मी. ३/६०० येथे शंभु उमरगा गावाजवळ लहान पुलाचे बांधकाम करण्यासाठी २ कोटी ४४ लक्ष ११ हजार रु. तर जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा डोंगरगांव सुल्लाळी मांजरी रस्ता प्रजिमा-२९ कि.मी. ५/५०० मधील डोंगरगांव गावाजवळील पुलाच्या जोडरस्त्याचे भूसंपादन करण्यासाठी ८० लक्ष रु, रामा २४९ माळेवाडी ते इजीमा ६३ रस्ता सुधारणा करण्यासाठी १कोटी ६० लक्ष रु., देऊळवाडी ते दापका रस्ता सुधारण्यासाठी २ कोटी ४० लक्ष रु., प्रजीमा २७ कुनकी विराळ करंजी कोळनुर प्र-२८ रस्ता सुधारणा करण्यासाठी २ कोटी रु., कुनकी विराळ करंजी कोळनुर रस्ता, जळकोट तालुक्यातील प्रजिमा २८ ते शिवाजीनगर तांडा ते पाटोदा बु. ग्रा.मा. क्र. २२ रस्त्याची पुल मोऱ्याच्या बांधकामासह सुधारणा करण्यासाठी ४ कोटी ८० लक्ष रु.,
शिवाजीनगर तांडा ते पाटोदा बु. रस्ता,
जळकोट तालूक्यातील प्रजिमा २५ ते शेलदरा उमरगा रेतू जगळपुर रस्ता ग्रा.मा. क्र. ०२ रस्त्याची पुल मोऱ्याच्या बांधकामासह सुधारणा करण्यासाठी ३ कोटी ५० लक्ष रु.,
उदगीर तालुक्यातील इस्लामपुर पाटी कल्लुर ते डोंगरशेळकी रस्ता सुधारणा करण्यासाठी
१ कोटी २० लक्ष रु., उदगीर तालुक्यातील इजिमा ४८ ते डोंगरशेळकी तांडा ते पिरतांडा रस्ता मजबुतीकरण व पुलमोऱ्यासह बांधकाम करण्यासाठी १ कोटी ५० लक्ष रु., असे उदगीर आणि जळकोट तालुक्यातील रस्त्यासाठी एकुण ४० कोटी ९१ लक्ष ९६ हजार रु तर जळकोट तालुक्यातील महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या शासकीय निवासस्थानांच्या बांधकामासाठी १३ कोटी २७ लक्ष ४० हजार असे एकुण ५५ कोटी ५४ लक्ष रु मंजूर केल्याने राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचे त्या - त्या भागातील नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.
0 Comments