GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

उदगीर मतदार संघाअंतर्गत सर्व नवयुवकांनी मतदारांची नोंदणी करावी; उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे व तहसीलदार रामेश्वर गोरे, तहसीलदार सुरेखा स्वामी यांचे आवाहन

उदगीर मतदार संघाअंतर्गत सर्व नवयुवकांनी मतदारांची नोंदणी करावी

 उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे व तहसीलदार रामेश्वर गोरे, तहसीलदार स्वामी यांचे आवाहन

उदगीर : उदगीर विधानभा अंतर्गत उदगीर व जळकोट तालुक्‍यामध्‍ये विशेष संक्षिप्‍त पूनरीक्षण मोहिम (SSR 2024) राबविण्‍यात येत आहे. सदर विशेष मोहिमेमध्‍ये दि.01.01.2024 रोजी वयाचे 18 वर्ष वय पूर्ण करण्‍या-या नव मतदारांची मतदार नोंदणी करण्‍यात येणार आहे. मतदार नोंदणीसाठी
संबंधीत नव मतदारांनी आपल्‍या कार्यक्षेत्रातील मतदान केंद्रस्‍तरीय आधिकारी यांच्‍याशी आजच संपर्क साधावा उदगीर व जळकोट तालुक्‍यात मिळून एकूण 336 यादी भागामध्‍ये मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी काम करतात. संबंधीतांना मतदार नोंदणीचे प्रशिक्षण देण्‍यात आलेले आहे. त्‍यामूळे नव मतदारांनी आपला वयाचा शासकीय पूरावा, रहिवाशी, स्‍वयंघोषणा पत्र व पासपोर्ट साईज फोटो बि.एल. ओ यांना दयावा. 
   तसेच जे नव मतदार शिक्षण व इतर कामानिमीत्‍य बाहेर गावी असल्‍यास त्‍यांनी भारत निवडणूक आयोगाच्‍या NVSP या संकेतस्‍थळावर भेट देवून ऑनलाईन मतदार नोंदणी करु शकतात शिवाय गुगल प्‍ले स्‍टोअर वर VOTER HELPLINE  (अॅप द्वारे ) मतदार यांची नोंदणी करु शकता.
  नवयुकवकांनी मतदारांची नोंदणी करण्याचे आवाहन उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, उदगीरचे तहसीलदार रामेश्‍वर गोरे जळकोटच्या तहसीलदार श्रीमती सुरेखा स्‍वामी यांनी केले आहे .

Post a Comment

0 Comments