GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

पुरस्काराचे यंदा चौथे वर्ष ,जानेवारीत होणार वितरण

 उदगीर : येथील रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान व मराठी पत्रकार संघ उदगीरच्या वतीने राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे .रंगकर्मी व मराठी पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट वार्ता व शोध वार्ता या दोन्ही गटासाठी वेगवेगळे  पुरस्कार दिले जाणार आहेत. पुरस्काराचे यंदाचे हे  चौथे वर्ष आहे.
यामध्ये शोधवार्ता गटातील प्रथम  ३००१ ₹ चे 
पारितोषिक कै.गौतम संभाजीराव सुर्यवंशी यांच्या स्मरनार्थ संघाचे सचिव सिध्दार्थ संभाजीराव सुर्यवंशी यांच्या वतीने रोख रक्कम व गौरवपत्र तर व्दितीय पारितोषिक २००१/-   प्रकट वीर हनुमान  मंदीर कौळखेड ,यांच्या वतीने रोख रक्कम व गौरवपत्र तर तृतीय पारितोषिक  मराठी पञकार संघ व रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा बिभीषण मद्देवाड यांच्या वतीने रोख १००१/- रु व गौरवपत्र देण्यात येणार आहे तर दुस-या गटातील उत्कृष्ट वार्ता गटात प्रथम पारितोषिक  ३००१ ₹ चे कै.व्यंकटराव सगर यांच्या स्मरनार्थ संघाचे उपाध्यक्ष  प्रा.भगिरथ सगर यांच्या वतीने रोख रक्कम व गौरव चिन्ह  तर व्दितीय पारितोषीक प्रा. बंकट कांबळे उदयगीरी महाविद्यालय उदगीर यांच्या वतीने   २००१ ₹ रोख रक्कम व गौरवपत्र तर रंगकर्मी प्रतिष्ठान व मराठी पञकार संघाचे अध्यक्ष  प्रा . बिभीषण मद्देवाड यांच्या वतीने तृतीय पारितोषीक १००१ रूपये  
रोख रक्कम व गौरवपत्र देण्यात येणार आहे.
या मराठी पत्रकार संघाच्या  'राज्यस्तरीय पुरस्कारासाठी शोध वार्ता व उत्कृष्ट वर्ता गटासाठी साप्ताहिक व दैनिकाच्या प्रतिनिधी ,वार्ताहार, संपादक ,उपसंपादकांनी  दि.१ जानेवारी २०२३ ते  २६ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत नावासह प्रकाशित झालेले किंवा नाव नसल्यास संपादकाचे शिफारस पत्र व प्रकाशित साहित्याची एक मुळ प्रतिसह  दोन साक्षाकिंत  प्रती , दोन पासपोर्ट साईज फोटो बिभीषण मद्देवाड , लोकाक्षर कार्यालय , ग्रामिण पोलिस स्टेशन समोर ,नांदेड रोड उदगीर , जि. लातूर 413517 या पत्त्यावर बातम्या पाठवण्याचे आवाहन मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.बिभीषण मद्देवाड, सचिव श्री.सिध्दार्थ सुर्यवंशी, उपाध्यक्ष प्रा.भगीरथ सगर, सहसचिव सुधाकर नाईक, कोषाध्यक्ष बबन कांबळे, नागनाथ गुट्टे, मनोहर लोहारे, बसवेश्वर डावळे, संग्राम पवार,भरत गायकवाड, अझरोद्दीन शेख, अविनाश सुर्यवंशी, बालाजी कसबे आदीसह सदस्यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments