माऊंट लिटरा झी स्कूल येथे 51 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न
उदगीर : दि. 15 व 16 डिसेंबर 2023 या दोन्ही दिवशी विज्ञान प्रदर्शनाला विविध भागातून आलेल्या शाळांचा मोठा प्रतिसाद मिळाला. हे प्रदर्शन पाहण्यास शहरातून भरपूर शाळांनी भेटी दिल्या माऊंट लिटरा स्कूल शाळेचा परिसर विज्ञानमय होऊन गेला.
एकूण 110 विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला होता .
इयत्ता सहावी ते आठवी ह्या प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक येण्याचा बहुमान माऊंट लिटरा स्कूल मादलापूर तालुका उदगीर ह्या शाळेला प्राप्त झाला तर द्वितीय व तृतीय क्रमांक विभागून देण्यात आले द्वितीय क्रमांक
विद्यावर्धिनी हायस्कूल उदगीर ए.आर. जहागीरदार उर्दू प्राथमिक शाळा हाळी
तृतीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सताळा तालुका उदगीर श्री विश्वनाथ चालवा प्राथमिक विद्यालय उदगीर इयत्ता नववी ते बारावी या माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक
संत सावतामाळी महाविद्यालय दावणगाव तालुका उदगीर द्वितीय क्रमांक राजे संभाजी माध्यमिक विद्यालय वाढवणा तालुका उदगीर
तृतीय क्रमांक पोस्ते पोद्दार लर्न स्कूल मलकापूर तालुका उदगीर शिक्षक गटातून प्रथम क्रमांक माउंट लिटरा स्कूल मादलापूर तालुका उदगीर द्वितीय क्रमांक टाइम्स पब्लिक स्कूल मलकापूर तालुका उदगीर
निरीक्षक म्हणून घोने , मोरे , श्रीमती मूर्ती , कांबळे , सय्यद यांनी अतिशय सूक्ष्मरित्या निरीक्षक म्हणून कामगिरी बजावली
सर्व विजेत्यांना शेख शफी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती उदगीर, बालाजी पोलावार अध्यक्ष माऊंट लिटरा स्कूल उदगीर , बसवराज बिरादार उपाध्यक्ष माऊंट लिटरा स्कूल उदगीर, ज्ञानेश्वर सावळे कोषाध्यक्ष माऊंट लिटरा स्कूल उदगीर, राजकुमार चौधरी सदस्य माऊंट लिटरा स्कूल उदगीर,धमनसुरे केंद्रप्रमुख व सर्व विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख पंचायत समिती उदगीर , शाळेचे मुख्याध्यापक राकेश कुमार देशपांडे यांच्या उपस्थितीत सर्व विजेत्या शाळांना व विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला व निवड झालेल्या सर्व विद्यार्थी व शाळांना जिल्हास्तरीय प्रदर्शनास शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ मनीषा हट्टे व जागीरदार यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.
0 Comments