GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

सी - डॅक ला राज्यस्तरीय बेस्ट ट्रेनिंग सेंटर पुरस्कार

सी - डॅक ला राज्यस्तरीय बेस्ट ट्रेनिंग सेंटर पुरस्कार 

उदगीर : येथील सी-डॅक कॉम्प्युटर्स राज्यस्तरीय बेस्ट ट्रेनिंग सेंटर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे . 
  हिंगोली येथे गुरुवार दि.१४ रोजी झालेल्या कार्यक्रमात एम.के.सी.एल च्या व्यवस्थापकीय संचालिका विना कामथ यांच्या हस्ते सी-डॅक कॉम्प्युटर्स चे अध्यक्ष सतीश उस्तुरे यांना सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. 
 उदगीरवासियांना मागील २५ वर्षापासून संगणकाचे धडे देत आहे . सी-डॅक कॉम्प्युटर्स द्वारे हजारो विद्यार्थी आणि नागरिक संगणक साक्षर होवून विविध क्षेत्रात कार्यरत आहेत . 
सी-डॅक मध्ये  आता नव्याने मराठा विद्यार्थ्याना सारथी योजने अंतर्गत विविध कोर्स मोफत शिकविले जात आहेत . 
 बेस्ट ट्रेनिंग पुरस्काराबद्दल सतीश उस्तुरे आणि सी-डॅक चे दयानंद टाके व विवेक देवर्षे यांचे प्राचार्य मनोज गुरूडे , सुधीर पाटील , रामदास मलवाडे , डॉ पंडित देवशेट्टे , शेषराव धनुरे , शिवाजी गिरी यांनी अभिनंदन केले .

Post a Comment

0 Comments