GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

संत सावता माळी विद्यालयाची विज्ञान प्रदर्शनासाठी जिल्हास्तरीय निवड

संत सावता माळी विद्यालयाची विज्ञान प्रदर्शनासाठी जिल्हास्तरीय निवड

विज्ञान प्रदर्शनात नऊ वेळा प्रथम येण्याचा मान सावता माळी विद्यालयाला

उदगीर : येथील माऊंट लिटेरा इंग्लिश स्कूलमध्ये उदगीर तालुक्याचे 51 वे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले होते. या विज्ञान प्रदर्शनामध्ये तालुक्यातील दावणगाव येथील संत सावतामाळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेतील विज्ञान शिक्षक कांबळे मच्छिंद्र यांनी घरगुती पाण्यापासून विद्युत निर्मिती हा प्रयोग तयार केला. इयत्ता नववीतील विद्यार्थिनी प्रतीक्षा पाटील, परमेश्वरी भंडे, प्रणिता बळदे यांनी हा प्रयोग अतिशय उत्कृष्ट सादर केला. या अनोख्या व अतिशय नाविन्यपूर्ण  प्रयोगास तालुक्यातून प्रथम क्रमांकासाठी निवड करून प्रथम पारितोषिक मिळाले आहे व या प्रयोगाची जिल्हास्तरावर निवड करण्यात आलेली आहे. या शाळेने आतापर्यंत नऊ वेळेस तालुकास्तरावर प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केलेला असून जिल्हास्तरावरून विभागीय स्तरावर दोन वेळेस या शाळेने प्रयोगाची निवड करून बहुमान प्राप्त केलेला होता. या यशाबद्दल या सर्व शिक्षक व विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष बालाजीराव फुले संस्थेचे सचिव तानाजीराव फुले शाळेचे मुख्याध्यापक शिवहार रोडगे शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments