खा.सुधाकर श्रृंगारे यांच्या संकल्पनेतून १३ एप्रिल रोजी महागायक आदर्श शिंदे यांचा बुध्द - भिम गीतांचा कार्यक्रम
समाजबांधवांसाठी प्रबोधन संध्या पर्वणी ठरणार
उदगीर : विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या संकल्पनेतून दि. 13 एप्रिल रोजी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध व लाडके महागायक आदर्श शिंदे यांचा भीम गीतांचा कार्यक्रम उदगीर शहरातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजेश्वर निटुरे हे
उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून उदगीरचे आमदार संजय बनसोडे, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, माजी आमदार सुधाकर भालेराव, माजी, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी जि.प. उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, ज्येष्ठ नेते भगवान पाटील तळेगावकर, भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष बापूसाहेब राठोड, माजी जिल्हा परिषद सदस्य बस्वराज पाटील कौळखेडकर , माजी जि.प. सदस्य दयानंद कांबळे, रिपाईचे मराठवाडा सरचिटणीस देविदास कांबळे, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अमोल निडवदे, माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, माजी उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, भाजपा शहराध्यक्ष मनोज पुदाले, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटोदे, भाजपा अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष बालाजी गवारे, भाजपा उदगीरचे तालुकाध्यक्ष बसवराज रोडगे, भाजपा जळकोट तालुकाध्यक्ष संभाजीराव केंद्रे , माजी तालुकाध्यक्ष वसंत शिरसे, उत्तराताई कलबुर्गे, पंडित सूर्यवंशी,
माजी शहराध्यक्ष उदयसिंह ठाकुर, माजी नगरसेवक बापूराव येलमटे, आदी मान्यवर उपस्थित राहणार असुन या भिम गीतांच्या कार्यक्रमाचा लाभ उदगीर तालुक्यासह परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन खा.सुधाकर श्रृगांरे आणि भाजपा शहर सरचिटणीस तथा कार्यक्रमाचे संयोजक पप्पु गायकवाड यांनी केले आहे.
0 Comments