GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक राज्य शासनाच्या कमिटीत आ.संजय बनसोडे यांची निवड

भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक राज्य शासनाच्या कमिटीत आ.संजय बनसोडे यांची निवड

उदगीर : तमाम आंबेडकरप्रेमी जनतेच्या मागणीचा विचार करुन दादर मुंबई येथे भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक राज्य शासनाचा वतीने उभारण्यात येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री देवॆंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक पाहणी व आढावा याबाबत इंदू मिल, दादर, मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.
 सदर बैठकीत दिलेल्या निर्देशास अनुसरून लोकप्रतिनिधी तसेच समाजातील मान्यवर व्यक्ती यांनी पुतळ्याची प्रतिकृती पाहून पुतळा अंतिम करणेबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्यानुषंगाने उदगीर विधानसभा मतदार संघाचे आ.संजय बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे.
दि. ५ व ६ एप्रिल २०२३ रोजी गाजियाबाद, दिल्ली येथे भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची प्रतिकृती पाहून पुतळा अंतिम करणेबाबत १४ मान्यवरांची कमिटी तयार करण्यात आली असुन या कमिटीत आ.बनसोडे यांची निवड केल्याने बौद्ध समाज बांधवातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.  महामानव , भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आज मी असुन त्यांच्या घटनेने दिलेले अधिकार व माझ्या समाजबांधवांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास यामुळेच मला ही संधी मिळाली असल्याची प्रतिक्रिया आ.बनसोडे यांनी बोलताना दिली आहे.

Post a Comment

0 Comments