नगर परिषदेच्या नविन वाहनांचे आ.संजय बनसोडे यांच्या हस्ते पुजन
स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी योजनेतून एका जेसीबीसह नविन ७ वाहने उपलब्ध
उदगीर : येथील नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता विभाग अंतर्गत कचरा वाहतुक करण्यासाठी नवीन मिनी टिप्परचे पूजन उदगीरचे माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते पुजन करण्यात आले.
नगरपरिषदेच्या वतीने शहरात राबवण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेसाठी वाहनाची कमतरता भासत होती त्या अनुषंगाने स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी योजनेतून चार मिनी टिप्पर , कॅम्पॅक्टर १, डंपर २, जेसीबी १, एकुण ८ वाहने आणण्यात येणार आहे.
नगर परिषदेच्या वतीने प्राथमिक स्वरूपात ३ वाहनांचे आ.संजय बनसोडे यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. या वाहनांचा स्वच्छता विभाग अंतर्गत कचरा व वाहतुकीकरिता तसेच डेब्रिज वाहतुकीकरिता या वाहनांचा उपयोग करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे , राष्ट्रवादीचे नेते बसवराज पाटील नागराळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजीराव मुळे, शहराध्यक्ष समीर शेख,
मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, कार्यालयीन अधिक्षक विरेंद्र उळागड्डे, स्वच्छता अभियंता दर्शन बिराजदार, बांधकाम अभियंता विजय माने , दारिद्र्य निर्मूलन विभाग प्रमुख महारुद्र गालट, भांडार विभाग प्रमुख संदीप कानमंदे, बांधकाम अभियंता ज्योती वलांडे, आस्थापना विभाग प्रमुख विजय एलगुलवार, स्वच्छता निरीक्षक उमाकांत गंडारे, अमित सुतार, विनोद रंगवाळ, नगरसेवक राजकुमार भालेराव, माजी नगरसेवक अनिल मुदाळे, शफी हाशमी, राजकुमार बिरादार, अविनाश गायकवाड, कुणाल बागबंदे, बाबासाहेब सुर्यवंशी, नामदेव भोसले, मनोज बलांडे, आदी उपस्थित होते.
यावेळी नगर परिषदेचे सर्व विभागाचे कर्मचारी, सफाई कामगार व नागरीक उपस्थित होते.
0 Comments