शहरात महाराष्ट्रातील एक नंबरचे अत्याधुनिक सांस्कृतिक भवन उभारणार : माजी मंत्री आ.संजय बनसोडे
सांस्कृतिक भवन उभारणीसाठी ९ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला
उदगीर : शहर तीन राज्याच्या सीमेवर असून या भागात विविध सांस्कृतिक उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवले जातात उदगीर शहरात विविध सांस्कृतिक चळवळी असुन अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी आत्याधुनिक हाॅल उपलब्ध नव्हता या कारणाने अनेक कार्यक्रम हे शहरातील विविध मंगल कार्यालयात आयोजित करण्यात येत होते त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमाचा येथील रसिक मंडळींना आनंद घेता येत नव्हता म्हणून सांस्कृतिक चळवळीतील काही कलावंतांनी व येथील रसिक श्रोत्यांनी उदगीर शहरांमध्ये एक अत्याधुनिक सांस्कृतिक भवन उभारावे अशी मागणी माझ्याकडे केली होती. त्यांच्या या मागणीचा विचार करून उदगीर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने एक अत्याधुनिक सांस्कृतिक भवन आपण उभारत असून भविष्यात शहरात होणारे सांस्कृतिक कार्यक्रम हे या सांस्कृतिक भावनात होतील म्हणून उदगीर शहरात महाराष्ट्रातील एक नंबरचे अत्याधुनिक सांस्कृतिक भवन उभारणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी केले.
ते उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवनच्या भुमीपुजन सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस राजेश्वर निटुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.शिवाजीराव मुळे, उदगीर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कल्याण पाटील, बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, माजी उपसभापती रामराव बिरादार, शिवसेनेचे तालुका प्रमुख कैलास पाटील, श्रीमंत सोनाळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष मंजुरखाँ पठाण, राष्ट्रवादीचे शहाध्यक्ष समिर शेख, शिवसेनेचे शहराध्यक्ष मुन्ना पांचाळ, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा
सुर्यशिला मोरे,प्रिती भोसले, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, माजी उपनगराध्यक्ष फैजु पठाण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष उर्मिला वाघमारे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रोहिदास कुंडगीर, विदेश पाटील, अनिरूद्ध गुरुडे, इम्तियाज शेख, इब्राहिम शेख, दत्ता बामणे, छावाचे दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, माजी नगरसेवक अनिल मुदाळे, शमशोद्दीन जरगर, विजयकुमार चवळे, ज्ञानेश्वर बिरादार, सतिश पाटील माणकीकर,जिजाऊ ब्रिगेडच्या अनिता जाधव, सिद्धेश्वर लांडगे, प्रदीप ढगे, उदय मुंडकर, निता मोरे, धनंजय गुडसुरकर, सरपंच चंद्रशेखर पाटील आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी,
या सांस्कृतिक भवनचे काम हे १२ महिन्यात पूर्ण करायचे असुन यासाठी जवळपास ९ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध
करुन दिला आहे. या सांस्कृतिक भवनात एकुण ७५५ व्यक्तींच्या आसनाची क्षमता आहे.
उदगीर शहरातील जिल्हा परिषदेच्या म्हणजे बी. आर. सी येथील जागेवर हे सांस्कृतिक भवन होत आहे. या भवनाच्या बाजूला प्रशाकीय इमारत, तहसील कार्यालयाची इमारत व पंचायत समितीची इमारत तर समोरील बाजूस नगर परिषद, बस स्थानक, पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालय असुन सदर सांस्कृतिक भवन हे मध्यवर्ती ठिकाणी होत असल्याने याचा फायदा या परिसरातील नागरीकांना होणार आहे. या भवनात महापुरुषांच्या जिवनवरील पुस्तके ठेवणार असुन त्यामुळे येणा-या पिढीला महापुरुषांच्या विचाराची प्रेरणा मिळेल असे सांगुन या भागातील जनतेच्या सेवेकरीता सदर काम वेळेत व दर्जेदार करण्याच्या सुचना संबंधित ठेकेदारास आ.बनसोडे यांनी दिल्या.
भविष्यात हुतात्मा स्मारकाची दुरावस्था झाली असुन त्यासाठी येत्या काळात आपण मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे मागणी करुन महाराष्ट्रातील सर्व हुतात्मा स्मारकाचे सुशोभिकरण करणार असल्याचे सांगून साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्या शेजारी साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या नावाने स्मारक उभारणार असुन यासाठी
तब्बल १४ कोटी ९९ लक्ष रुपयाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असुन त्या कामासही लवकरच मंजुरी घेवुन ते आपण करणार आहोत तर नळेगाव रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने प्रवेशव्दार उभारण्याकरीता १ कोटी रुपये मंजूर केले असुन या प्रवेशव्दारावरावर गड किल्याची प्रतिकृती करुन प्रवेशव्दार उभारणार असल्याचे सांगितले. पुढील काळात शहरातील जळकोट रोड येथेही प्रवेशव्दार उभारणार असल्याचे सांगितले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशव्दारासाठी १ कोटी रुपये व उदगीर शहरात शाहु महाराज पुतळा सुशोभिकरण करण्यासाठी ४० लक्ष रुपये मंजूर केल्याने
मराठा समाजबांधव व शिवप्रेमींच्या वतीने छ.शिवाजी महाराज चौकात आ.संजय बनसोडे यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.श्याम डावळे यांनी केले तर आभार दत्ता पाटील यांनी मानले. यावेळी मराठा सेवा संघाचे पदाधिकारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments