GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

उदगीर शहरात चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती उत्साहात साजरी

उदगीर शहरात चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती उत्साहात साजरी


उदगीर : येथील रेल्वे स्टेशन, जवळील
नालंदा बुद्ध विहारात चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांची 2327 वी जयंती समाजबांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदगीर नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती तथा समाजाचे ज्येष्ठ नेते गजानन सताळकर हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून मनोहर कांबळे, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक दिलीप कांबळे, दयानंद शिंदे, नवनाथ गायकवाड, बाळासाहेब पाटोदे उपस्थित होते. यावेळी प्रथमतः बुद्ध विहारात चक्रवती सम्राट अशोका, तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करुन त्यानंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी सर्व प्रभागातील जयंती महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास विद्यासागर डोरनाळीकर, अॅड. माधव उदगीरकर, नामदेव बामणे, निवृत्ती भाटकुळे, सतीश वाघमारे, शिवमूर्ती उमरगेकर, अनिल सोमवंशी, मायाताई कांबळे, प्रीतम सूर्यवंशी, अरुण उजेडकर,  अशोक कांबळे एकुर्केकर, धनाजी बनसोडे, अजय बलांडे, मनोज बलांडे, प्रदीप महापुरे, सुधीर बलांडे, राहुल कांबळे, शुभम गायकवाड, निलेश गायकवाड, आकाश कस्तुरे, बबन सुळकेकर, कपिल मादळे, आकाश मादळे, बंटी मटके, जगन्नाथ बेलदार,
प्रकाश वाघमारे, सोनू कांबळे, वैशाली कांबळे, दत्ता कांबळे, प्रदीप कांबळे, धीरज वाघमारे, करण जोगदंड आदी उपस्थित होते.
यावेळी सर्व प्रभागातील जयंती मंडळाचे कार्यकर्ते , पदाधिकारी महिला व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments