बौद्ध धर्मीय सामुहिक मंगल परिणय सोहळ्याचे आयोजन
यंदाचा चौथा बौद्ध धर्मीय विवाह सोहळा ३० मे रोजी
उदगीर : येथील कै. नामदेवराव सटवाजी गायकवाड बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने बौध्द धर्मीय सामुहिक मंगल परिणय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा दि. ३० मे २०२३ रोजी मंगळवारी सांयकाळी ६. ४५ वाजता, जिल्हा परिषद मैदान उदगीर येथे पार पडणार असल्याची माहिती मुख्य आयोजक पप्पू गायकवाड यांनी दिली. सामूहिक मंगल परिणय सोहळ्यात सहभागी होणाऱ्या जोडप्यांना, शुभ्र वस्त्र, मनी-मंगळसूत्र, जोडवे, गादी पलंग, संसार उपयोगी भांडे, सहभागी मंडळींना, भोजन संस्थेतर्फे दिले जाईल. शिवाय सह आयुक्त समाज कल्याण लातूर, तर्फे वधू पित्याला कन्या दान म्हणून वीस हजार रुपयाची रक्कम दिली जाणार आहे. सहभागी होणाऱ्या जोडप्यांचे वय शासनाच्या मान्यतेनुसार मुलाचे वय 21 वर्ष तर मुलीचे वय 18 वर्ष असणे बंधनकारक आहे.
कै. नामदेवराव सटवाजी गायकवाड बहुउद्देशीय सेवाभावी संस्था उदगीरच्या वतीने
दरवर्षी हा बौद्ध धर्मीय सामुहिक मंगल परिणय घेतला जातो. यंदाचा चौथा सोहळा असुन या सामुहिक बौध्द धर्मीय मंगल परिणयात आपल्या पाल्यांचा विवाह करू इच्छिणाऱ्यांनी भंन्ते नागसेन बोधी थेरौ मो.9420477358, विद्यासागर डोरनाळीकर मो.9823660052, प्रा. व्यंकट बलांडे मो.8329368191, एस.डी. कांबळे मो.8390429309, ॲड. बालाजी सूर्यवंशी, मो.9850938331, अमोल तांबरे मो.9673652035, विनोद सोनकांबळे मो.9022503842, गौतम गायकवाड मो.9665993375, सिद्धार्थ सूर्यवंशी, मो.8605545652 यांच्याशी संपर्क साधून नाव नोंदणी करण्याचे आवाहन पप्पू गायकवाड मो.9822697424 यांनी केले आहे.
0 Comments