नीता मोरे संकल्पच्या सन्मानाने सन्मानित
उदगीर : जागतिक महिला दिनानिमित्त संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने, " जागर स्त्रीत्वाचा,सन्मान कर्तुत्वाचा " या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या अंतर्गत विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या,समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या,निवडक महिलांचा सन्मान केला. नीता मोरे यांचा सन्मान माजी आ. सुधाकर भालेराव, संकल्पच्या श्रद्धा जगताप यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
याप्रसंगी मंचावर अध्यक्ष म्हणून माजी आमदार सुधाकर भालेराव , नारी प्रबोधन मंच लातूरच्या अध्यक्षा सुमती जगताप, संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा श्रद्धा जगताप, सचिव अमर वाघमारे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, शंकरराव लासुणे, कुसुमताई मोरे,भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटोदे, उदगीर शहर चे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक उदगीर ग्रामीणचे राजकुमार भोळ,महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य उत्तराताई कलबुर्गे, प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्व विद्यालयाच्या महानंदा बहनजी, मनोज पुदाले, सुधीर भोसले, सुनील सावळे,नरेंद्र शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष धनराज बिरादार, नेहा यादव,तृप्ती पंडित हे उपस्थित होते.
नीता मोरे यांनी शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात भरीव असे योगदान दिले आहे. राष्ट्रीय,राज्यस्तरीय,जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अशा 35 पेक्षा जास्त पुरस्काराने त्या सन्मानित आहेत. गरजूंना शैक्षणिक साधनांचे व गणवेशाचे वाटप, पूरग्रस्त निधी संकलन, स्वच्छता अभियान, कोरोना काळात दिव्यांगांना व गरजूना अन्नधान्य किटचे वाटप, बिगर लोकांसाठी फराळ वाटप, अंध विद्यार्थ्यांना मदतीचा हात, कष्टकरी व वसतिगृहातील विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन साजरा, तसेच गरजू महिलांना साडीचोळी वाटप असे विविध उपक्रम राबविलेले आहेत.
त्यांच्या या सन्मानाबद्दल विजयकुमार जाधव, मधुकरराव वट्टमवार, शंकरराव लासूणे, सतनप्पा हूरदळे, अंबादास गायकवाड, संजय कुलकर्णी, बलभीम नळगीरकर, लालासाहेब गुळभिले, माधव मठवालें, प्रमोदिनी रेड्डी, आशा मोरे, चैतन्य जाधव,चेतक जाधव यांनी अभिनंदन केले आहे.
0 Comments